![]()
मालेगाव तालुक्यातील तिवळी (जि. वाशिम) येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संतोष तुकाराम बकाल (३८) यांचा मृतदेह शेतातील विद्युत टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी वर्षा (३४), मुलगी जान्हवी (८) आणि मुलगा सोहम (४) यांचे मृतदेह विहिरीत आढळले. संतोषकडे केवळ २ एकर शेती आहे. शिरपूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या सामूहिक मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Source link
मालेगावला एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू:पतीचा मृतदेह टॉवरवर, तर पत्नीसह 2 मुलांचे मृतदेह विहिरीत सापडले