Headlines

सोशल मीडियाच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी हवी “मोबाइल पार्किंग’:शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार यांचे पालकांना आवाहन‎



सध्या सोशल मीडियावर बहुमूल्य असणारा वेळ खर्च होत असून वाढत्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे घरासमोर वाहने लावण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करतो अगदी तशाप्रकारे आपल्या घराच्या आतमध्ये देखील मोबाइल पार्किंगची सुविधा क

.

परिहार म्हणाल्या, पालकांनी मुलांवर अपेक्षांचे फार ओझे देण्यापेक्षा जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यावर कुठल्याही संकटावर मात करून सहजपणे त्यातून मार्ग काढून यशस्वी जीवन जगू शकतो अशा पद्धतीने त्यावर संस्कार व्हायला हवेत. अनेक विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून देखील कधीकधी आयुष्याच्या परीक्षेत नापास होतात. यामुळे फक्त गुणांकडे लक्ष न देता त्याच्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे. अभ्यास महत्त्वाचा आहे मात्र त्याबरोबरच जवळपासची माणसे देखील वाचता आली पाहिजेत. यामुळे जीवन जगताना आर्थिक, मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठलीही हानी होत नाही.

संस्थेचे सचिव सतीश गुगळे म्हणाले, या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संस्थेवर विश्वास दाखवून निवड केली याबद्दल आभार मानतो. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जागतिक घडामोडीत या संस्थेतील विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही, जगाच्या बरोबरीने अथवा एक पाऊल पुढे येथील प्रत्येक विद्यार्थ्याचा राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगत पालक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल पानखडे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक सातपुते यांनी केले तर आभार भारत गाडेकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *