Headlines

जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांच्या खांद्यावर केंद्रप्रमुखांची जबाबदारी




शिक्षकांमधून निवडावयाच्या केंद्रप्रमुख पदाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांच्या खांद्यावर नवी जबाबदारी टाकण्यात आली आहे. सदर प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. या अनुषंगाने पात्र जिल्हा सेवा शैक्षणिक (वर्ग-३) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक संवर्गातील उमेदवारांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्याची कार्यवाही करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल उपशिक्षणाधिकारी किशन फोले, अधीक्षक. नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अत्यंत पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने पार पडली. या पदोन्नती प्रक्रियेसाठी एकूण ९७ पात्र शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी ६७ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती देण्यात आली. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ (सुधारणा २०२५) परिशिष्ट चार (भाग-२) मधील अ.क्र. (८) (अ) अन्वये ही प्रक्रिया पूर्ण केली गेली. जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने ही प्रक्रिया राबविली. ती यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, विजय कविटकर, वरिष्ठ सहाय्यक राहुल काळमेघ, शरद शहाकार, विजय राऊत तसेच कनिष्ठ सहाय्यक अनिकेत हुरडे यांनी सहकार्य केले. ४ उमेदवारांचा नकार, एक अपात्र केंद्रप्रमुखांची एकूण रिक्त पदे ७१ होती. त्यापैकी ६६ उमेदवारांनी पदोन्नती स्वीकारली, तर ४ उमेदवारांनी पदोन्नती नाकारली. तसेच १ उमेदवार अपात्र असल्यामुळे गैरहजर राहिला. याशिवाय दिव्यांग (अस्थिव्यंग) प्रवर्गातील १ उमेदवाराससुद्धा पदोन्नती देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *