Headlines

विहिर निकामी; 2 किमीची पायपीट:मोरगडचे आदिवासी झिऱ्यातून काढताहेत पाणी, प्रशासनाने खोदलेली विहिरही बंद‎




पावसाळा सुरु झाला. परंतु मेळघाट अजूनही पाण्यासाठी त्राही-त्राही करतो आहे. चिखलदरा तालुक्यातील मोरगडच्या आदिवासींना गावाशेजारील नदीपात्रात झिरा खोदून पाणी मिळवावे लागत आहे. तर पाण्यासाठी प्रशासनाने तयार केलेली माखल्याची विहिर चक्क बंद पडली आहे. त्यामुळे दोन किलोमीटरची पायपीट करुन महिलांना पाणी आणावे लागत आहे. मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे गेल्या आठ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे तेथील नागरिकसुद्धा सुमारे २ किलोमीटर दूर नदीपात्रात झिरा (छोटा खड्डा) खोदून तेथून पाणी मिळवत आहेत. यामुळे महिला, वृद्ध, लहान मुले व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून ते पाणी पुरेशा प्रमाणात शुद्ध नसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. परंतु सुस्त प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आदिवासींना त्रास सहन करुनच दिवस काढावे लागत असल्याचे माखला (टेंभुर्णी ढाणा) येथील आदिवासींचे म्हणणे आहे. मोरगडमध्ये पाण्याचा स्रोत नाही. त्यामुळे विहिर खोदणे हा पर्याय उपयोगी पडत नाही. माखलाचे चित्र तर वेगळेच आहे. माखला आणि माखला (टेंभुर्णी ढाणा) असे हे जोडगाव आहे. शेजारील नदीचा आश्रय आता दूरवर अधिग्रहित केलेल्या विहिरीवरुन बंद पडलेल्या विहिरीशेजारच्या एका शेतातील जुन्या विहिरीत पाईपद्वारे पाणी आणले जात आहे. त्यानंतर ते पाणी शेंदून नागरिक आपली तहान भागवत आहेत. मोरगडचा प्रश्नही याहून वेगळा नाही. तेथेही नळ योजना बंद पडल्याने नागरिकांना गावाशेजारच्या नदीचा आश्रय घ्यावा आताच्या उन्हाळ्यात ग्रामस्थांना लागत आहे. सौर उर्जेचीही व्यवस्था माखल्यात ‘हर घर नल से जल’ ही योजना सुरु करण्यात आली होती. परंतु ती आरंभशूर ठरली. सुरुवातीच्या काही दिवसांतच ती बंद पडली. त्यामुळे नागरिकांनी गावापासून दूर एका गळती लागलेल्या पाईपमधून पाणी मिळवणे सुरु केले आहे. माखला टेंभुर्णी ढाण्यासाठी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र विहीर खोदली. त्या विहिरीतील पाणी बाहेर काढण्यासाठी बाजूलाच सौर उर्जेचीही व्यवस्था केली होती. महिलांचा अख्खा दिवस पाण्यासाठी वाया जातोय माखला येथील महिलांना अख्खा दिवस पाण्यासाठी घालवावा लागतो. दुपारी उन्हामुळे जीव कासावीस होतो. परिणामी सकाळी, सायंकाळी रांगा लाऊन महिलांना पाणी भरावे लागते. महिला ज्या ठिकाणाहून पाणी आणतात, तो व्हाल्व (कांक्रीटचे आच्छादन असलेला उभा पाईप) मुख्य जलवाहिनीशी जोडलेला आहे. परंतु त्याला गळती लागल्याने माखलावासियांना किमान दिलासा मिळाला आहे. दरम्यान महिलांना पाण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याने पुरुषांना स्वाभाविकच मिळकतीच्या अंगमेहनतीची कामे करावी लागत आहेत. ‘खोज’च्या वॉटर ऑडीटने उघड केले खरे सत्य ॲड. पौर्णिमा उपाध्याय यांच्या नेतृत्वात मेळघाटमध्ये ‘खोज’ संस्थेचे कामकाज सुरु आहे. या भागातील नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी ही संस्था काम करते. मेळघाटच्या चिखलदरा आणि धारणी या दोन्ही तालुक्यात दरवर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. या पार्श्वभूमीवर ‘खोज’ने यावर्षी ‘वॉटर ऑडीट’ हा उपक्रम राबविला. त्याअंतर्गत अनेक गावात त्यांना पाण्याची समस्या आढळून आली. त्याचा अहवाल त्यांनी थेट राज्यपालांपर्यंत पोहोचविण्याचे ठरवले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *