![]()
महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्हे तर स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या
.
सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार बळवंत वानखडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात सामाजिक समता आणि बंधुता टिकवण्यासाठी महात्मा फुले यांचे विचार अधिक प्रभावी ठरतात. काँग्रेस पक्ष त्यांच्या विचारसरणीवर चालत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करत आहे. कार्यक्रमाला राजीवकाका ठाकूर, हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख, प्रकाशराव काळबांडे, रामेश्वरराव अभ्यंकर, सतीशराव हाडोळे, संजयराव नागोणे, मुकद्दर खा पठाण, सिद्धार्थ बोबडे, बिट्टूभाऊ मंगरोळे, नंदकिशोर यादव उपस्थित होते.