![]()
बाळापूर नगर परिषद क्षेत्रात साफसफाईची कामे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे असून, याबाबत नगर परिषदेमधील ११ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन केले. या मुद्दावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नगर परिषद निवडणुकीनंतर गत चार महिन्यांपासून शहरातील साफसफाई व्यवस्था ढासळली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असून त्यातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डास आणि इतर कीटकांची संख्या वाढून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सदर प्रकरणात संबंधित ठेकेदाराने काम बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पदाधिकाऱ्यांना याबाबत वारंवार सूचना देऊनही ठोस कारवाई झालेली नाही. निविदा प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. याबाबत तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.निवेदनावर खतीब सैय्यद ऐनोद्दीन, संजय उमाळे, सायमा तबस्सुम अरबाज खान, निखल नाज अकील अहमद, सैय्यद अहमद अली सैय्यद इमाम इम्रात रफत, फरजाना परवीन सलीम अहमद, अमजद हुसेन अली मोहम्मद, चौधरी असमा परवीनसमीरोद्दिन, मो. अनवर परवेज गुलाम नबी, खुर्शीद अहमद शकिल अहमद आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. सभेतील चर्चेची नोंद नाही, चौकशी होणे आवश्यक पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या हिताच्या निविदा काढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. काम न करणाऱ्या कंत्राटदारांला मुदतवाढ देण्यात आली. तसेच नवीन घनकचरा संकलनाची प्रक्रियाही सुरू झालेली नाही. सर्वसाधारण सभेत साफसफाईबाबत चर्चा झाली. मात्र बैठकीच्या बुकमध्ये नोंद नाही. प्रसंगी आम्ही सर्व ११ नगरसेवक प्रतिज्ञालेखाद्वारे िलहून देण्यास तयार आहोत. या पार्श्वभूमीवर, संबंधित प्रकरणाची चौकशी उपविभागीय अधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
Source link
बाळापूरमध्ये साफसफाई ठप्प; आरोग्याचा प्रश्न गंभीर:नरगसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, देयक थांबवावेत