Headlines

भोंदू अशोक खरातच्या संशयास्पद संभाषणांचा पर्दाफाश:'शिजूका' अन् 'नॉडी' कोडवर्डने यायचे फोन, अंजली दमानियांचा धक्कादायक दावा!




नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाशात पोलिसांच्या विशेष तपास पथकाचा (SIT) फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘कॉल डिटेल्स’बाबत (CDR) नवीन गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली आहे. खरातला ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ यांसारख्या कोडवर्डने असंख्य फोन येत असल्याचे दमानिया यांनी उघड केले आहे. अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या संशयास्पद संपर्कांची माहिती प्रसारमाध्यमांसमोर ठेवली. त्यांनी खरातचा सीडीआर तपासला असता त्यात काही नंबर विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. दमानिया म्हणाल्या, मी जेव्हा सीडीआरमधील नंबर ट्रूकॉलरवर सर्च केले, तेव्हा त्यात ‘शिजूका’ आणि ‘नॉडी’ अशी नावे समोर आली. खरातने अनेक मोबाइल नंबरला विशिष्ट कोडवर्ड दिले होते. ही नावे म्हणजे त्याच कटाचा एक भाग असावा.या कोडवर्डच्या आडून खरात नेमका कोणाच्या संपर्कात होता, याचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. खरातची पत्नी 10 दिवसांपासून फरार दुसरीकडे, शिर्डी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून खरातची पत्नी कल्पना खरात नाशिकमधील राहत्या घरातून गायब आहे. तिला फरार होऊन 10 दिवस उलटले तरी तपास यंत्रणेच्या हाती अद्याप काहीही लागलेले नाही. कल्पनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तिच्या माहेरच्या लोकांकडे आणि इतर नातेवाईकांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या परिसरात अशोक खरातची जागा भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात याने पुणे, शिर्डी आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांनंतर आता सोलापुरातही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासातून समोर आले आहे. अशोक खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजेच सुमारे 11 एकरांहून अधिक जमीन स्वतःच्या नावावर खरेदी केली असून, या नवीन खुलाशामुळे त्याच्या बेनामी संपत्तीचे धागेदोरे आता सोलापूरपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 28 मार्च 2024 रोजी नोंदणी झालेल्या या व्यवहाराची किंमत 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये असून, यामध्ये अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याने, जिथे जमिनीचे बाजारभाव साधारण 5 ते 6 लाख रुपये प्रति एकर आहेत, तिथे खरातने तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर या चढ्या दराने ही जमीन खरेदी केल्याचे खरेदीखतातील नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *