![]()
छत्रपती संभाजीनगर येथे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगपुरा येथील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. यावेळी संगठन सृजन अभियानचे जिल्हा प्रभारी माजी आमदार विवेक बन्सल आणि प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि समाजातील वंचित व शोषित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही प्रेरणादायी आहे. यावेळी महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाजात समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जगन्नाथ काळे, उमाकांत खोतकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अनिस पटेल, शेख कैसर बाबा, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, इंजि. इफ्तेखार शेख, शेख रईस, साहेबराव बनकर, योगेश थोरात, अरुण शिरसाट, मोईन कुरेशी, मुकेश सोनवणे, शफीक शहा, शेख फय्याजुद्दीन, रवी लोखंडे, बाबासाहेब पवार, डॉ. सिकंदर शेख, मंजूताई लोखंडे आदींचा समावेश होता.
Source link
काँग्रेसकडून महात्मा फुलेंना अभिवादन:जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न