Headlines

कान्होरी जि. प. शाळेचा लवकरच‎‎ कायापालट:ग्रामस्थांनी दिली देणगी,‎ विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा देण्याचा उद्देश




फुलंब्री ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एस. एम. सेहगल फाउंडेशनच्या ‘ट्रान्सफॉर्म लाइव्ह्ज’ प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्होरी, ता. फुलंब्री येथे दुरुस्ती व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात शाळेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. याच भावनेतून या शाळेचा कायापालट करण्यासाठी फाउंडेशनने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गावचे सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास फाउंडेशनचे योगेश सिंगारे, प्रोग्राम लीड, अमोल भिलंगे, असिस्टंट प्रोग्राम लीड, अनिकेत जाधव, अमोल सावदेकर, जीवन घोरपडे आणि नेहा बुरझाडे यांनी उपस्थित राहून प्रकल्पाची माहिती दिली. या उपक्रमाला गावकऱ्यांनी लोकसहभागातून मोठा आर्थिक व सामाजिक पाठिंबा दर्शविला आहे. भूमिपूजनप्रसंगी सरपंच वंदना हरिदास म्हस्के, उपसरपंच बापूराव म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य कांताबाई साहेबराव म्हस्के, बाळकृष्ण साळवे, अशोक वखरे, अंजना कल्याण डांगर, माजी सरपंच प्रभाकर सोटम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीराम म्हस्के, साहेबराव म्हस्के आणि इतरांनी भरघोस लोकवर्गणी देऊन सहकार्याचे आश्वासन दिले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवलाल राजपूत, उपाध्यक्ष सरला म्हस्के, छाया म्हस्के, अकबर शहा, रंजित वाहूळ आणि रंजना राजू म्हस्के यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले. विद्यार्थी डिजिटल युगाशी जुळणार विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना डिजिटल युगाशी जोडणे आवश्यक आहे. या प्रकल्पांतर्गत शाळेच्या इमारतीचे दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, सौरऊर्जा प्रणाली, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर आवश्यक शैक्षणिक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *