Headlines

मृग नक्षत्र कोरडे:सांगोला तालुक्यात 30 हजार हेक्टरवरील खरीप पेरण्या रखडल्या, 40 हजार हेक्टरचे नियोजन कोलमडले; फळबागांसह ऊस पिके संकटात‎



मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्याने सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची पेरणीपूर्व तयारी

.

यंदा कृषी विभागाने तालुक्यात सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरणीला सुरुवातच होऊ शकलेली नाही. गेल्या वर्षी जून महिन्यातच जवळपास ३० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे उलट असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सांगोला तालुका कायमच कमी पर्जन्यमानाचा असल्याने खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. सध्या अनेक शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र पेरणीसाठी आवश्यक ओलावा नसल्याने ही सामग्री गोदामातच पडून आहे. पाऊस आणखी लांबल्यास दुबार मशागतीचा खर्च वाढण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्याची पाणीपातळी झपाट्याने घटत असून जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आता अधिक तीव्र झाली आहे.

तालुक्यात डाळिंब क्षेत्र घटल्यानंतर गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. मात्र यंदा उन्हाळा लांबल्याने आणि पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी ऊस पिवळसर पडू लागला आहे. ठिबक सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनाही पाण्याची ^जून संपत आला तरी अद्याप पाऊस न झाल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. डाळिंबीनंतर आम्ही ऊस लागवड केली, परंतु पाण्याअभावी तो सुकून जाऊ लागला आहे. पेरणीसाठी तसेच ऊस व इतर फळ पिकांसाठी पाऊस लवकर येणे अत्यंत जरुरीचे आहे. – संतोष खंडागळे, ऊस उत्पादक शेतकरी, ^सांगोला तालुक्यात खरिपाचे सरासरी ३० हजार हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी खरिपाचे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पावसाअभावी आतापर्यंत फक्त २ हजार १२५ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी जून अखेर सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पावसाअभावी यावर्षी पेरणी लांबणार आहे. – दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला. तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरलेल्या ८२ गावांच्या शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून सध्या मागणीनुसार २० गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत आहे, त्या ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, कमलापूर, कोळा आणि चिंचोली या तीन गावांमध्ये सध्या सात टँकरद्वारे दररोज सुमारे साडेतेरा खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे. जूनअखेरपर्यंतही पाऊस न झाल्यास आणखी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो, अशी शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. जाणवत आहे. उसाबरोबरच डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट, आंबा यांसारख्या फळबागांनाही फटका बसू लागला आहे. विहिरींची पाणीपातळी घटल्याने बागांना आवश्यक पाणी देणे कठीण होत आहे. काही ठिकाणी फळगळ सुरू झाली असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *