![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंदोलकांना धमक्या देणे, बॉम्ब टाकण्याची भाषा करणे आणि जीवघेण्या इशाऱ्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे. ‘माझ्या नादाला लागू नका’ वक्तव्यावर आक्षेप संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांविरोधात राज्यभरात आंदोलने सुरू असताना संजय दिना पाटील यांनी आंदोलकांना गंभीर धमक्या दिल्या. “माझ्या नादाला लागू नका, नाहीतर हॉस्पिटलमध्ये किंवा स्मशानात पाठवीन,” अशा वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली. ‘पाच जणांना मारल्याचा’ दावाही चर्चेत पत्रात राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्याचा संदर्भ दिला आहे, ज्यात त्यांनी “मी याआधी पाच लोकांना मारले आहे” असा दावा केल्याचे नमूद केले आहे. या दाव्याची स्वतंत्र चौकशी करून सत्यता तपासावी आणि खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. बॉम्ब टाकण्याच्या धमकीची चौकशीची मागणी संजय दिना पाटील यांनी “माझ्याविरोधात आंदोलन केले तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन” अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ राजकीय वाद नसून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर मुद्दा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या वक्तव्यांची चौकशी करून गरज पडल्यास यूएपीएसारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारच्या धमक्यांमुळे समाजात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच भविष्यात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची नैतिक जबाबदारी संजय दिना पाटील यांच्यावर राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे. संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांना लिहलेले पत्र कर्जमाफीचा गाजावाजा, पण 70 टक्के शेतकरी वंचित: रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, विनाअट सरसकट कर्जमाफीची मागणी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत कितीही दावे करत असले तरी प्रत्यक्षात जाचक अटी-शर्तींमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सविस्तर वाचा
Source link
विरोध केला तर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन:संजय पाटलांच्या धमकीवरून संजय राऊत आक्रमक, पोलिस आयुक्तांकडे केली अटकेची मागणी