Headlines

Uddhav Thackeray Remembered Leaders After MPs Left; Shiv Sena-BJP One Ideology


शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढण्यासारखेच आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. शिवसेना आणि भाजपला आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही, आम्ही एकाच विचारधारेवर चालणारे दोन पक्ष आहोत, असे शिवसेना नेते योगेश कदम यांनी म्हटले आहे. ठाकरे गटातील सह

.

योगेश कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. ते ज्या पद्धतीने संघटना चालवत आहेत ते सर्वांनी पाहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते विधानसभेपेक्षाही जास्त फिरले आणि कार्यकर्त्यांची पाठिशी उभे राहिले हे देखील खूप महत्त्वाचे आहे.

..तेव्हा दौरा का केला नाही

योगेश कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सोडून गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार आहेत, तो केल्याने काही फरक पडेल असे मला वाटत नाही. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होती त्यावेळी उद्धव ठाकरे प्रचारासाठी का गेले नाही. त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर का सोडले? लोकप्रतिनिधींना साथ सोडल्यावर त्यांना स्थानिक पदाधिकारी आठवत आहेत, पण ते जेव्हा निवडणुकीला सामोरे जात होते त्यावेळी उद्धव ठाकरे का गेले नाही? असा सवाल कदम यांनी केला आहे. उद्धव ठाकरे केवळ सोयीचे राजकारण करणार का? हा प्रश्न उपस्थित होतोच ना.

..तर दानवेंमध्ये बदल होईल

अंबादास दानवे हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीसोबत लढवत आहेत, त्यावर बोलताना योगेश कदम म्हणाले की, सहकारी बँकेच्या निवडणुका या राजकारण विरहित होत असतात. पण अंबादास दानवे यांना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांनी जी मदत केली आहे, याची जाणीव जर त्यांनी ठेवली तर त्यांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो.

संबंधित बातमी वाचा…

महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या गैरहजेरीची दखल घेत ‘आपल्यात खरोखर एकी आहे का?’ अशी चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.