![]()
तालुक्यातील टाकळीमानूर परिसरातील तांबेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घराची मागील भिंत फोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दादासाहेब गोपीनाथ तांबे (वय ३०, रा.तांबेवाडी,ता.पाथर ्डी) यांनी फिर्याद दिली आहे.तांबे हे कडा (ता.आष्टी) येथील एका पतसंस्थेत सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.नवीन घर बांधण्यासाठी त्यांनी लोकांकडून आणलेले एक लाख रुपये व घरातील २५ हजार रुपये असे एकूण १ लाख २५ हजार रुपये घरातील लोखंडी पेटीत ठेवले होते.दरम्यान,२२ जून रोजी रात्री ते कामानिमित्त कडा येथेच मुक्कामी होते.२३ जून रोजी पहाटे वडिलांनी फोन करून घरफोडी झाल्याची माहिती दिली.घरी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता घराच्या मागील बाजूची कच्च्या विटांची भिंत फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे आढळले.घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस,५ ग्रॅम कानातील सोन्याच्या रिंगा,२ ग्रॅम मणी मंगळसूत्र तसेच १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source link
भिंत फोडून घरफोडी; तांबेवाडीत 1.93 लाखाचा ऐवज लंपास:लेझीम पथक, धार्मिक देखावे अन् जयघोषाने दुमदुमले पाथर्डी