![]()
अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्यांना उशीर झाल्याने यंदा अधिकाधिक शेतकरी कपाशीला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र बियाणे, ट्रॅक्टर भाडे, रासायनिक खते आणि तणनाशकांच्या वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बुधवारी जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. बहुतांश तालुक्यांत ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला. जूनचा शेवटचा आठवडा सुरू असताना झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. काही भागांत मान्सूनपूर्व पेरणी झाली होती; मात्र बुधवारी झालेल्या पावसानंतर गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत पेरण्यांना मोठी गती मिळाली. यावर्षी शेतकऱ्यांना कमी पावसाच्या शक्यतेबरोबरच वाढलेल्या कृषी निविष्ठांच्या दरांचाही सामना करावा लागत आहे. खतांच्या किमतींमध्ये २५ टक्क्यांहून अधीक वाढ झाली. ( दोन दिवसांचा विक्रम, वर्षभराचा बोजा; खरीपच्या गणितात शेतकरी संकटात ) प्रा. डॉ. के. पी. सिंग, कृषी शास्त्रज्ञ, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर ट्रॅक्टर भाड्यातही प्रतिएकर २०० ते ३०० रुपयांनी वाढ आखाती देशातील युध्दामुळे तसेच इंधनदरवाढीचा फटका शेती क्षेत्रालाही बसला आहे. डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे पेरणीसाठी ट्रॅक्टर भाड्यात प्रति एकर सुमारे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी प्रति एकर सुमारे ८०० ते ९०० रुपये असलेला दर यंदा १,१०० ते १,२०० रुपयांपर्यंत पोहोचला. खतांच्या दरात मोठी उसळी २०:२०:०:१३ हे खत मागील वर्षी सुमारे १,२५० रुपयेप्रति बॅग होते; यंदा ते थेट २ हजार १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. १२:३२:१६ खताचा दर १,४५० रुपयांवरून १,८०० रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणून बाजारात गर्दी नाही ^मागील वर्षाच्या तुलनेत रासायनिक खते तसेच काही कीटकनाशकांच्या दरांत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुमारे ७० टक्के बियाण्यांची खरेदी आधीच झाली होती, त्यामुळे बाजारात यंदा विशेष गर्दी दिसून आली नाही. – मिलिंद इंगोले, अध्यक्ष, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघ, अमरावती.
Source link
वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती