Headlines

2029 पूर्वी शिंदेंचे आमदार फुटून भाजपमध्ये जातील:रोहित पवारांचा दावा, शेतकऱ्यांसाठी संभाजीनगरमध्ये आंदोलनाचा इशारा




भाजपचे सध्याचे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरील प्रेम केवळ महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी आहे. २०२९ च्या आधी एकनाथ शिंदेंचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटून भाजपमध्ये जाऊ शकतात,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ‘डिलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) बिल पास करण्यासाठी भाजपला संसदेत अजून ४१ खासदारांची गरज आहे, एकदा का हे बिल पास झाले की सध्याच्या प्रादेशिक पक्षांच्या खासदारांची किंमत ‘झिरो’ होईल, असा इशाराही त्यांनी दिला. ठाकरे-फडणवीस विमान प्रवास हा निव्वळ योगायोग उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकाच विमानाने झालेल्या प्रवासावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “तो केवळ एक योगायोग होता. उद्धव ठाकरे साहेब हे अत्यंत स्वाभिमानी नेते आहेत, त्यामुळे त्या प्रवासावरून राजकीय चर्चा करणे चुकीचे आहे.” ठाकरे गटाच्या ६ खासदारांच्या पक्षांतरावर भाष्य करताना, लोकांना या फुटीर खासदारांचा निर्णय अजिबात आवडलेला नाही, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन राज्यातील महायुती सरकारवर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, सरकार सध्या केवळ शब्दांचा खेळ करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. आता नेत्यांवर विश्वास ठेवण्याचे दिवस गेले आहेत. शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात मोठे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सरसकट‎‎ कर्जमाफी‎‎शिवाय‎‎ स्वस्थ बसणार‎‎ नाही- पवार कर्जमाफी योजनेत ८०‎टक्के शेतकरी अपात्र ठरत आहेत. ‎‎शेतकऱ्यांना‎‎ सरसकट‎‎ कर्जमाफी‎‎ घेतल्याशिवा य‎‎स्वस्थ बसणार‎‎ नाही, असा इशारा‎ आमदार रोहित पवार यांनी‎ पत्रपरिषदेत दिला. २९ जून रोजी ‎छत्रपती संभाजीनगर येथे सर्वपक्षीय ‎एल्गार अन्नदात्याचा आंदोलन ‎करण्यात येणार असल्याचे त्यांनी‎ सांगितले. सरकारने कर्जमाफी ‎देताना दोन जाचक अटी घातल्या ‎आहेत, अशी टीका त्यांनी केली. नीट पेपरफुटीवरून पवार आक्रमक 2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे रोहित पवार यांनी म्हटले. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने त्यांचे धाडस वाढले, म्हणून पुन्हा 2026 मध्ये पेपर फुटला. नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत केली पाहिजे. रोहित पवार म्हणाले की, अमोल मिटकरी यांना आमदारकी मिळाली पाहिजे होती ही सर्वांची भावना होती, पण त्यांना संधी देण्यात आली नाही. मिळाले कोणाला तर कोकणातील नेत्याच्या मुलाला आणि भाईजींच्या दिवानजींना संधी मिळाली आहे. अजित पवार नाराज असलेल्या नेत्यांनाच आज ताकद दिली जात असेल तर मग संदेश असा जातो की पक्षाच्या अध्यक्षांचे काही चालत नाही इतर नेत्यांचे चालते. आता संघर्षांचा काळ आहे यात खरी भूमिका घेण्याची गरज आहे. लोकांसाठी लढणे गरजेचे आहे, पण काही लोकांना सत्ता जास्त गरजेची आहे असा टोला अजित पवार गटातील नेत्यांना नाव न घेता लगावला आहे. खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात: यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे लक्ष ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या विदर्भ दौऱ्याची पहिली जाहीर सभा आज सकाळी १० वाजता यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *