Headlines

कारहुणवी सणावर दुष्काळाचे सावट:सलगरमध्ये पाऊस नसल्याने उत्साह मंदावला‎




शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा कारहुणवी सण यंदा २९ जून रोजी वटपौर्णिमेनिमित्त साजरा होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात या सणाला विशेष महत्त्व असून, बैलांचा साजशृंगार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे कारहुणवी सणावर दुष्काळ व अनावृष्टीचे सावट पसरल्याचे चित्र आहे. बैलांच्या सजावटीसाठी लागणारे झुल, दोरे, बाशिंग, घुंगरूमाळ, पट्टे, मोरपिसांचे तुरे, रंग आदी साहित्याने बाजारपेठा सजल्या असल्या तरी शेतकऱ्यांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून येत नाही. पावसाअभावी शेतीची कामे रखडल्याने बळीराजा चिंतेत असून, सणाचा आनंदही काहीसा फिका पडला आहे. यामध्ये बैलांना मंदिराभोवती वेगाने प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असून, त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये जणू स्पर्धाच रंगते. या यात्रेसाठी पंचक्रोशीसह सीमावर्ती कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने भाविक आणि शेतकरी उपस्थित राहतात. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीची चिंता वाढली असून, कारहुणवीच्या पारंपरिक उत्साहावर दुष्काळाचे सावट असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे कारहुणवी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांना आकर्षक पिवळा रंग लावून, विविध अलंकारांनी सजवून त्यांची पूजा केली जाते. नैवेद्य दाखवून गावातील हनुमान मंदिरापर्यंत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत बैलांची मिरवणूक काढली जाते. कारहुणवी म्हणजे यात्रेचा उत्सव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *