Headlines

कुर्डुवाडी ट्रॉमाच्या पदनिर्मितीला मंजुरी:तीन उपकेंद्रे पुन्हा दुर्लक्षित, माढ्यात आरोग्य इमारतींचे जाळे; पण कर्मचाऱ्यांअभावी ठरताहेत पांढरा हत्ती‎



माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर इमारतींचे जाळे उभे राहत असले, तरी प्रत्यक्षात मात्र कर्मचाऱ्यांअभावी या इमारती पांढरा हत्ती ठरत आहेत. शासनाच्या २४ जून रोजीच्या नव्या शासन निर्णयानुसार कुर्डुवाडी

.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांच्या पदनिर्मितीला मंजुरी दिली. यामध्ये कुर्डुवाडी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या पदनिर्मितीचा प्रदीर्घ प्रश्न सुटला आहे. याशिवाय जिल्ह्यातील बिटरगाव, कुरणवाडी, भोसे, लेंढवे चिंचोळे, कात्राळ, अकोला, खोमनाळ, खवनी, लोणविरे, हगलूर आणि कंदेहळी येथील उपकेंद्रांना मंजुरी मिळाली. मात्र, माढा तालुक्यातील घाटणे, बुद्रुकवाडी व भोगेवाडी या तीन उपकेंद्रांच्या पदनिर्मितीची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची मागणी असूनही शासनाने त्याकडे पाठ फिरवली आहे.

तालुक्यात सध्या ९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४३ उपकेंद्रे कार्यरत आहेत. नव्याने सुरू झालेल्या म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पदे मंजूर असूनही अद्याप कायमस्वरूपी भरती झालेली नाही, त्यामुळे तिथे सध्या बाह्य यंत्रणेद्वारे सेवा दिली जात आहे. दुसरीकडे, सापटणे (भोसे) येथे २०२१ मध्येच नवीन मॉडेल उपकेंद्राची इमारत पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे येथे पदे मंजूर असूनही भरती न झाल्याने ही इमारत धूळ खात पडली आहे. घाटणे, बुद्रुकवाडी व भोगेवाडी येथील उपकेंद्रांचीही हीच अवस्था आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नांमुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. ^घाटणे, बुद्रुकवाडी व भोगेवाडी येथील उपकेंद्राच्या पदनिर्मितीला २४ जूनच्या शासन निर्णयात देखील मंजुरी मिळाली नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यामार्फत शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून आम्ही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत. डॉ. सागर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी, माढा. ^माढा तालुक्यातील तिन्ही आरोग्य उपकेंद्राच्या पद निर्मितीचा विषय पालकमंत्री महोदयांकडून तातडीने मंजूर करून घेण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. शिवाजी कांबळे, माजी समाजकल्याण सभापती . दारफळ : प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर असूनही जागेअभावी काम ठप्प आहे. . वाकाव : नियोजित प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी गायरान जागेचा प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. . इतर प्रस्ताव : लऊळ प्राथमिक आरोग्य केंद्रासह घोटी, जाधववाडी (मो), मोडनिंब २, उजनी (मा), कुर्डू २ आणि टेंभुर्णी १ अशा एकूण ६ आरोग्य उपकेंद्रांचे प्रस्ताव जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून शासन स्तरावर पाठवण्यात आले असून ते प्रलंबित आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *