Headlines

समाधानकारक पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या:शेतकरी तयारीत व्यस्त, मूर्तिजापूर तालुक्यात तुरळक पावसावर कपाशीची टोचणी सुरू‎




मृग नक्षत्र संपले तरी तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. दोन दिवस आलेल्या पावसाने सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग देत आहेत.शेतांमध्ये ट्रॅक्टर तसेच बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी,पट्टीपास, सऱ्या पाडणे, बांध दुरुस्ती आदी कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही ठिकाणी शेतमजुरांच्या मदतीने पेरणीसाठी शेताची अंतिम तयारी केली जात आहे. परिसरात केवळ तुरळक स्वरूपात कापसाची टोबणी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी हा पाऊस जमिनीची तहान भागवण्यासाठी पुरेसा ठरलेला नाही. पेरणीसाठी जमिनीत आवश्यक असणारा ओलावा आणि ‘वाफसा’ अद्याप निर्माण न झाल्याने, शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करण्याचे टाळले आहे. आधीच बियाणांचे आणि खतांचे दर गगनाला भिडले असल्याने, दुबार पेरणीचे संकट ओढवू नये यासाठी शेतकरी कमालीची खबरदारी घेत आहेत.तालुक्यातील काही भागात जेथे ओलाव्याचे प्रमाण किंचित बरे आहे किंवा सिंचनाची जुजबी सोय आहे, अशा ठिकाणी केवळ तुरळक स्वरूपात कापसाची टोबणी करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश कोरडवाहू क्षेत्र अद्यापही पहिल्या मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान खात्याने आगामी काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने, लवकरच मेघराजा बरसेल आणि तालुक्यात पेरणीचा श्रीगणेशा होईल, या आशेवर शेतकरी मशागतीचे कामे चोख ठेवून सज्ज झाला आहे. चांगला पाऊस झाल्यास येणार वेग शेतकऱ्यांच्या मते पुढील दोन-तीन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग येईल. अन्यथा पेरण्या आणखी लांबण्याची शक्यता असून त्याचा उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. बहुतांश कोरडवाहू क्षेत्र अद्यापही पहिल्या मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान खात्याने आगामी काळात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने, लवकरच मेघराजा बरसेल आणि तालुक्यात पेरणीचा श्रीगणेशा होईल, या आशेवर शेतकरी मशागतीचे कामे चोख ठेवून सज्ज झाला आहे.दमदार पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या असून काही ठिकाणी कापूस टोबणीला सुरुवात केली आहे. कृषी विभागाच्या वतीने पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनो, धीर खचून देऊ नका पेरण्या रखडल्या असल्या तरी शेतकऱ्यांनी आपला धीर खचू दिलेला नाही. पावसाने दिलेल्या या विश्रांतीचा उपयोग शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची उर्वरित कामे आटोपण्यासाठी करत आहेत. सध्या संपूर्ण तालुक्यात शेतीच्या कामांना मोठा वेग आला आहे. शेतांमध्ये ट्रॅक्टरच्या धडधडाटासह बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी करणे, पट्टीपास फिरवणे, सऱ्या पाडणे आणि शेताचे बांध दुरुस्त करणे अशी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ज्या शेतकऱ्यांची प्राथमिक मशागत झाली आहे, ते शेतमजुरांच्या मदतीने ढेकळे फोडणे आणि कचरा वेचून शेत पेरणीसाठी तयार ठेवण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *