Headlines

राहुरीत ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा शिवसेनेत प्रवेश:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल‎



शिवसेनेतील पक्षफुटीनंतर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये राहुरी तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल

.

जिल्हा प्रमुखपदावरून हटवल्यानंतर खेवरे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. अखेर त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. राहुरी तालुक्यातील त्यांचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचे जाळे आणि संघटन कौशल्य पाहता, त्यांचा हा पक्षबदल ठाकरे गटासाठी फटका मानला जात आहे. ठाणे येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी खेवरे यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उपजिल्हाप्रमुख सचिन बडधे, रामहरी सिकंडे, अनिल बांगरे, मच्छिंद्र धुमाळ, सोमनाथ गोरे, सुनील शेलार, संजय म्हसे, पोपट शिरसाठ, हरिभाऊ शेळके आणि राजूभाऊ झावरे उपस्थित होते. या पक्षप्रवेशासाठी शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे यांनी समन्वय साधला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खेवरे यांचे हे पक्षांतर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे राहुरी तालुक्यातील तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *