Headlines

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सुटीत प्रलंबित फायलींचा केला निपटारा:सीईओंच्या आदेशाने कार्यालय सुरू ठेवले, तालुका स्तरावरही काम; तक्रारदारांना लेखी उत्तरही पाठवले




अमरावती जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही काम केले. प्रलंबित फायलींचा जलद निपटारा करण्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी याबाबत आदेश दिले होते. त्यामुळे ज्या विभागांच्या फायली प्रलंबित होत्या, त्या विभागांचे प्रमुख आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन काम केले. सीईओंच्या आदेशामुळे जिल्हा परिषद मुख्यालयच नव्हे, तर तालुका स्तरावरील काही बीडीओंची कार्यालयेही सुटीच्या दिवशी सुरू होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रकरणांचा निपटारा केला आणि तक्रारदारांना लेखी उत्तरेही पाठवली. या कामकाजाचा सविस्तर अहवाल सोमवारी, १२ ऑक्टोबरला दुपारी २ वाजेपर्यंत मागवण्यात आला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी ही माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *