![]()
अमरावती शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सरकारी कार्यालये आणि शाळांच्या भिंतींजवळ कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मनपाचा स्वच्छता विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. शिवटेकडी, जिल्हा परिषद विश्रामगृह, कस्तुरबा शाळेच्या भिंतींजवळ कचरा जमा झाला आहे. गांधी चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, रेल्वे स्टेशन परिसरातही अशीच स्थिती आहे. बबन इंगोले यांनी मनपा प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला. नागरिक आणि व्यावसायिक उघड्यावर कचरा टाकतात. मनपाच्या घंटागाड्या व सफाई कामगार नियमित येत नाहीत. यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास वाढली. विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याची चिंता पालकांनी व्यक्त केली. ‘स्वच्छ शहर’ अभियानाचा दावा करणाऱ्या मनपा प्रशासनावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. सरकारी कार्यालयांबाहेरच घाण असल्याने मनपाने तात्काळ कचरा हटवावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
Source link
सरकारी कार्यालये, शाळांच्या भिंतींजवळ कचऱ्याचे ढीग; मनपा दुर्लक्ष:अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा, नागरिकांचा तीव्र रोष, साथीच्या रोगांची भीती