![]()
पुसला येथील पंढरी मध्यम प्रकल्पातून परिसरातील शेतीला पाणी मिळणार आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याची ग्वाही दिली आहे. यामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली येऊन संत्रा बागा वाचणार आहेत. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भवानी माता पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी इंद्रभूषण सोंडे आणि शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता राजभोज यांची भेट घेतली. दुष्काळी परिस्थितीमुळे संत्रा बागा वाचवण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर्षी कमी पावसामुळे विहिरींमध्ये फक्त १० ते १५ मिनिटे पुरेल एवढेच पाणी आहे. वरुड तालुक्यातील लोहादरा, उराड, पुसला, एकदरा येथील संत्रा बागांना पाण्याची गरज आहे. मिरची, कापूस आणि तूर पिकेही पाण्याअभावी वाळत आहेत. अधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
Source link
पंढरी प्रकल्पातून शेतीला पाणी मिळणार, अधिकाऱ्यांनी दिली ग्वाही:खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाची भेट घेतली