Headlines

शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘स्पार्क’मध्ये स्टार्टअप संकल्पना मांडल्या:स्पर्धेत नऊ गटांतील 24 विद्यार्थ्यांनी भाग घेतला; विजेत्यांना रोख बक्षिसे मिळाली




अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाने ‘स्पार्क २०२६ – इ स्टार्टअप आयडीएशन चॅलेंज’ स्पर्धा घेतली. यात नऊ विद्यार्थी गटांतील २४ विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअप संकल्पना सादर केल्या. नव्या कल्पनांना प्रोत्साहन देणे हा स्पर्धेचा उद्देश होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे अध्यक्षस्थानी होते. पंजाब अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्राध्यापक डॉ. शिवाजीराव झोमाडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. डॉ. झोमाडे यांनी त्यांचे ‘एक उद्योजक’ हे पुस्तक ग्रंथालयाला भेट दिले. राधिका देशमुख व वैष्णवी नसारे यांनी प्रथम क्रमांक मिळवून पाच हजार रुपये जिंकले. आशिष खंडारे, समीक्षा वानखडे व लक्ष्मी चव्हाण यांना द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये मिळाले. सिद्धांत इंगळे व शिवम बारस्कर यांनी तृतीय क्रमांक पटकावत दोन हजार रुपये जिंकले. उषा कसाडकर, सलोनी कांबळे, रितू लडके, मिलिंद रुपनारायण आणि तुषार रुपनारायण यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. डॉ. सुदर्शन लोहकरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *