Headlines

पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO:रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणीवर अचानक कोसळले झाड, थोडक्यात वाचला जीव




पुण्यातील अभिनव चौकाजवळ एक अत्यंत थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. रस्त्यावरून उभ्या असलेल्या एका तरुणीवर अचानक एक भलंमोठं झाड कोसळलं. मात्र, काळाने घाला घातला तरी वेळ आली नव्हती, याची प्रचिती या घटनेतून आली असून ही तरुणी या भयंकर दुर्घटनेतून सुदैवाने आणि सुखरूप बचावली आहे. तिला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण घटनेचा थरार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नागरिकांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ तरुणी रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक झाड तिच्या अंगावर कोसळले आणि ती त्याखाली दाबली गेली. हा प्रसंग पाहताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून अत्यंत वेगाने तिला झाडाखालून सुखरूप बाहेर काढले. नागरिकांच्या या तत्परतेमुळे मुलीचा जीव वाचला. अग्निशमन दलाकडून रस्ता मोकळा या दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर पडलेले झाड कापून बाजूला केले आणि वाहतुकीसाठी रस्ता पुन्हा मोकळा केला, अशी माहिती पुणे अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी जुन्या आणि धोकादायक झाडांखाली थांबणे किंवा चालणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. संबंधित बातम्या वाचा.. मरोळमध्येही काल झाड कोसळले: 4 वाहनांचे नुकसान, एक जण गंभीर जखमी अंधेरी पूर्वमधील मरोळ मिलिटरी रोड परिसरात बुधवारी दुपारी मोठे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळल्याने चार वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. या सलग घटनांमुळे मुंबईतील धोकादायक झाडांच्या तपासणी आणि महापालिकेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावर देत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बामन दया पाडा, मरोळ मिलिटरी रोडवरील मोरे हॉटेलजवळ मोठे झाड उन्मळून पडले. या झाडाखाली एक धावती टोयोटा अर्बन क्रूझर तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ह्युंदाई सँट्रो, महिंद्रा XUV700 आणि मारुती वॅगन-आर या तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. सविस्तर वाचा झाड पडणार हे आधी कसं कळणार?:चेंबूर दुर्घटनेनंतर मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून नवा वाद, विरोधक आक्रमक चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. “झाड पडणे किंवा वीज पडणे या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. कोणते झाड कधी पडणार हे आधी कसे कळणार?” असे शिरसाट यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *