![]()
बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणितदिवसेंदिवस कठीण होत असताना लातूरजिल्ह्यातील जेवळी येथीलप्रगतिशील शेतकरी अमृतगंपले यांनी अवघ्या २०गुंठ्यांत ९०० वांग्याच्यारोपांची लागवड करूनकेवळ नऊ महिन्यांत सुमारे६ लाख रुपयांचे उत्पादनमिळवले. यात दीडलाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचेनिव्वळ उत्पन्न मिळवले आहे. गंपलेयांच्याकडे एकूण दोन एकर शेती आहे. यापूर्वीते ऊस, हरभरा आणि सोयाबीन ही पारंपरिकपिके घेत होते. मात्र वाढता उत्पादन खर्च,अनियमित पाऊस, मजुरांची टंचाई आणिबाजारातील चढ-उतार यामुळे अपेक्षित नफामिळत नव्हता. कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्नदेणाऱ्या शेतीचा शोध घेत असताना सोलापूरयेथे पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरतअसलेल्या त्यांच्या ताईंनी लातूरमधील एकानर्सरीतील विशेष वाणाच्या वांग्याच्या रोपांचीमाहिती दिली. ही रोपे सहा फूट उंचीपर्यंतवाढतात आणि एकदाच लागवड करून सलगतीन वर्षे उत्पादन देतात हे समजल्यानंतर त्यांनीहा प्रयोग सुरू केला. गंपले यांनी ६ बाय ४ फूटअंतरावर ९०० रोपे लावली. २० गुंठ्यांचे खर्च आणि उत्पन्नाचे गणित अवघ्या २० गुंठ्यांत ९०० वांग्याची रोपे लावून गंपले यांनीनऊ महिन्यांत १,३०० हून अधिक कॅरेट वांग्यांची विक्रीकेली. प्रति कॅरेट सरासरी ५०० रुपये दर मिळाल्याने त्यांनासुमारे ६ लाखांचे उत्पन्न मिळाले. या प्रकल्पासाठी रोपे,ठिबक सिंचन, खते, औषधे, मजुरी व इतर खर्च मिळूनसुमारे दीड लाख रुपये खर्च आला. सर्व खर्च वजा जातासाडेचार लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळाला. विशेष म्हणजेही वांग्याची लागवड सलग तीन वर्षे उत्पादन देणारीअसल्याने पुढील काळातही नियमित उत्पन्न मिळू शकते. आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सअॅपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी.
Source link
प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न