![]()
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्यानर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांच्यापायी पालखी सोहळयाचे रविवारी पंढरपूरकडेप्रस्थान झाले आहे. यावेळी शेकडो भाविकपालखी सोहळ्यात सहभागी झाले. आजहिंगोलीत रिंगण सोहळा रंगणार आहे,पालखीचे हे ३१ वे वर्ष आहे. ३५० किमी अंतरपायी कापून २४ जुलैला पालखी पंढरपूरलापोहोचणार आहे. नर्सी नामदेव येथून दुपारी ‘जय जय रामकृष्णहरी’च्या गजरात पालखी निघाली. यावेळीसंस्थानच्या परिसरात पालखीचे पूजन करण्यातआले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येनेउपस्थिती होती. पालखी सोहळ्यात चालकप्रमुख म्हणून बळीराम सोळंके काम पाहणारआहेत. या पालखी सोहळ्यात किर्तनकार,गुणीजन मंडळी, मृदंगाचार्य सहभागी झालेआहेत. पालखी सोहळ्याचे पूजन झाल्यानंतरगावातून नगर प्रदक्षिणा घेण्यात आली. यापालखी सोहळ्यात शेकडो भाविक सहभागीझाले असून पालखी सोहळा सोमवारी दुपारीहिंगोलीत पोहोचणार आहे. त्यानंतर रामलिलामैदानावर पहिले रिंगण होणार आहे. पालखीचा मुक्काम असा ७ जुलै औंढा नागनाथ, ८ जुलै बाराशिव, ९जुलै हट्टा, १० जुलै परभणी, ११ जुलैपोखर्णी, १२ जुलै गंगाखेड, १३ जुलैउक्कडगाव, १४ जुलै परळी वैजनाथ, १५जुलै अंबाजोगाई, १६ जुलै बोरी सावरगाव,२० जुलै खांडवी, २१ जुलै चिंचगाव(टेकडी), २२ जुलै लहुळ, २३ जुलै आष्टी,२४ ते २९ जुलै पंढरपूर. आज पालिकेतर्फे स्वागत पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठीहिंगोली पालिकेच्या वतीने जय्यत तयारीकरण्यात आली असून नांदेडनाका येथेनगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या हस्तेपालखीचे पूजन करून स्वागत केलेजाणार आहे. यावेळी आमदार तान्हाजीमुटकुळे, आमदार संतोष बांगर, गटनेतेश्रीराम बांगर उपस्थित राहणार आहेत. पाच ठिकाणी होईल रिंगण या पालखी सोहळ्याचे पहिले रिंगणआज ६ जुलैला हिंगोली येथे होणारआहे. त्यानंतर १२ जुलैला सकाळी ९वाजता दैठणा, १४ जुलै दुपारी ४वाजता परळी वैजनाथ, १५ जुलैदुपारी ४ वाजता अंबाजोगाई, १७ जुलैसकाळी १० वाजता जवळबन येथेरिंगण होणार आहे.
Source link
आज हिंगोलीत रिंगण:नर्सीतून संत नामदेव महाराज पालखीचेप्रस्थान; 19 दिवसांनी पंढरीत पोहोचणार