![]()
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पैठण शहरासह तालुक्यात उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. या पार्श्वभूमीवर निळ्या ध्वजांची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. तालुक्यातील विविध भागांत, शहरातील प्रमुख चौकांमध्ये निळे ध्वज विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. यंदा साधारण दोन लाखांच्या आसपास ध्वजांची विक्री होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांकडून मोठी मागणी आहे. विक्रेत्यांनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ध्वजांच्या किमतीतही विविधता आहे. छोट्या ध्वजांची किंमत १० रुपयांपासून सुरू होते. मोठ्या ध्वजांसाठी ५०० रुपयांपर्यंत दर आकारला जातो. विक्रेते जगदीश लोहिया यांनी सांगितले की, यंदा मागील वर्षांच्या तुलनेत निळ्या ध्वजांची मागणी लक्षणीय वाढली आहे. जयंतीनिमित्त शहर, तालुक्यात ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे. आज सकाळी अभिवादन रॅलीसह विविध कार्यक्रम पैठण शहरात, ग्रामीण भागात होत आहेत. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे.
Source link
पैठणला आंबेडकर जयंतीनिमित्त दोन लाख निळ्या ध्वजांची विक्री:अवघ्या दहा रुपयांपासून थेट 500 रुपयांपर्यंत आहे दर