![]()
विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमी निर्माण होण्याकरिता व विद्यार्थी पर्यावरणाशी समरस होऊन परिसरातील इतरही वृक्षांच्या बियांच्या संकलनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण होण्याकरता बारा-तेरा वर्षापासून अशा उपक्रमाचे आयोजन अरूण भगत गुरूजी यांच्याकडून टिळक राष्ट्रीय विद्यालयात केले जाते. आज रोजी संकलित झालेल्या बियांची लागवड पावसाळ्यामध्ये माळरानावर करण्यात येणार आहे. खामगाव येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे माजी संस्थाध्यक्ष मधुसूदन गाडोदीया, माजी संस्थाध्यक्ष अशोकभाऊ झुंझुनुवाल,विद्यमान संस्था अध्यक्ष सुधाकर अजबे, उपाध्यक्ष सुरेश पारीक, कोषाध्यक्ष उमेश अग्रवाल, विश्वस्त रमेश दाणे यांच्या ‘आपल्याच परिसरातील बी, आपलीच रोपवाटिका व आपलेच संगोपन’ या आवाहनाला प्रतिसाद देत वर्ग ६ वी चे वर्ग शिक्षक हरित सेनाप्रमुख व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक अरुण भगत व विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक पातुर्डे गुरूजी यांच्या मार्गदर्शनामध्ये क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंतीनिमित्त शालेय परिसरातील अमलताशच्या हजारो बियांचे संकलन दि. १३ एप्रिल रोजी केले. बी संकलन करण्यामध्ये वर्ग शिक्षक अरुण भगत यांनी व वर्ग प्रतिनिधी सोहम आशिष जोध, जयश्री अमर देशमुख ,चंचल गजानन सावरकर, अख्तर रजा शेख जावेद, शेख कामरान शेख कलीम, सय्यद साहील सय्यद गफ्फार, सय्यद रेहान सय्यद उस्मान, शेख अरशद शेख अस्फाक,शे.अहेमद राजा शे.युनूस, सै.फरहान सै.आसिफ, मो.सर्जील अब्दुल लतिफ, रेहान खान आसिफ खान कुरेशी, शेख मेराज शेख मुजम्मील, जिगर मधुकर मालठाणे, भूमिका रवि लांडगे, रोहन मोहन उमाळे, सम्यक रवींद्र कळसकार, भावेश दादा वाकोडे, पीयूष राहुल इंगळे, भूषण निंबाजी मेढे, रितू संतोष सावरकर, प्राची किशोर सावरकर, रोशनी किसन सावरकर, पूनम बंडू मदारीवाले, दीपा नारायण नाईकवाड, विद्या उदाराम सावरकर, रितीका बाळू बेनिवाल, आर्यन किसन भगतपूरे, शुभम गणेश मदारीवाले, इशिता आकाश सपकाळ, जयश्री अनिल कळसकार, दीपाली रमेश बावणे,योगेश गजानन पाठक, अबुजर इरफान कामनवाले, अनुराज रंगराव कोळपे यांनी सक्रिय सहभाग घेत हा उपक्रम राबवला.
Source link
विद्यार्थ्यांनी संकलित केल्या विविध वृक्षांच्या बिया, टिळक राष्ट्रीय विद्यालयाचा वृक्षप्रेमी निर्माण होण्याकरता बारा वर्षांपासून उपक्रम