![]()
गोदरेज इंडस्ट्रीज समूहाची संपत्ती व्यवस्थापन शाखा असलेल्या गोदरेज वेल्थने पुण्यात प्रवेश केल्याची घोषणा केली. मुंबईनंतर महाराष्ट्रातील कंपनीचे हे दुसरे कार्यालय असेल. पारंपरिक व्यावसायिक कुटुंबे, उद्योजक आणि जागतिक अनुभव असलेल्या व्यावसायिकांना संपत्ती व्यवस्थापन सेवा पुरविण्यावर कंपनीचा भर राहणार आहे. राष्ट्रीय विस्तार धोरणांतर्गत कंपनीने २०३१ पर्यंत व्यवस्थापनाखालील मालमत्ता एक लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे आणि देशभरातील ३५ ठिकाणी उपस्थिती निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील विस्तार हा कंपनीच्या राष्ट्रीय प्रवासातील पुढील टप्पा ठरला आहे. गोदरेज वेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल कर्नानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ पर्यंत पुण्यातील म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता सुमारे ३.१४ लाख कोटी रुपये होती. पुणे देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी म्युच्युअल फंड बाजारपेठ आहे. शहरात सुमारे २२,५०० लक्षाधीश कुटुंबे असून, उत्पादन, वाहन आणि अभियांत्रिकी उद्योगांसोबत ५०० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे आणि वाढती स्टार्टअप परिसंस्था संपत्ती निर्मितीला चालना देत आहेत. पुण्यात पारंपरिक व्यावसायिक कुटुंबांसोबत नव्या पिढीतील संपत्ती निर्मात्यांचा विस्तार होत असल्याचे कंपनीने नमूद केले. उद्योजकता, तंत्रज्ञान कंपन्या आणि जागतिक स्तरावरील अनुभव असलेले मनुष्यबळ यामुळे शहरातील संपत्तीचा पाया अधिक वैविध्यपूर्ण होत आहे. या विविध ग्राहकसमूहांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक गरजा आणि वैयक्तिक आर्थिक प्राधान्ये समजून घेण्यावर भर दिला जाणार आहे.प्रत्येक ग्राहकाच्या गरजा, परिस्थिती आणि अपेक्षा वेगळ्या असल्याचे सांगितले. आयआयटी मुंबईतील प्राध्यापकांच्या शैक्षणिक सहकार्याचे पाठबळ या क्षमतांना लाभले आहे. पुण्यात अनुभवी वेल्थ मॅनेजर्सच्या नियुक्तीवर भर देऊन ग्राहकांशी अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. गोदरेज वेल्थचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर संदीप झा यांनी सांगितले की, संपत्ती निर्मिती आता पारंपरिक आर्थिक केंद्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही. औद्योगिक वारसा, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मनुष्यबळाचा संगम असलेले पुणे या बदलाचे उदाहरण आहे. विश्वास, ग्राहकांचे सखोल आकलन आणि दीर्घकालीन संबंधांवर कंपनीचा व्यवसाय आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.कंपनी उत्पादनकेंद्रित दृष्टिकोनाऐवजी ग्राहककेंद्रित सेवा देणार आहे. ग्राहकांना समजून घेण्यासाठी ‘गोदरेज सिग्नल्स’, तर जोखीम मूल्यांकनाद्वारे गुंतवणूक पर्याय तपासण्यासाठी ‘गोदरेज चॉइस’ या क्षमतांचा वापर केला जाणार आहे.
Source link
गोदरेज वेल्थचा पुण्यात प्रवेश:महाराष्ट्रातील दुसरे कार्यालय; देशातील चौथ्या क्रमांकाची मोठी म्युच्युअल फंड बाजारपेठ