Headlines

आता पुरे! गुन्हेगारीविरुद्ध जनतेची एकजूट:संघटित गुन्हेगारी विरोधात श्रीरामपूरच्या इतिहासात प्रथमच भव्य आक्रोश मोर्चा, बंद मागे‎




आकाश दुबय्या हत्येनंतर संतप्त झालेल्या श्रीरामपूरकरांनी बुधवारी हजारोंच्या उपस्थितीत शहराच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनांपैकी एक मोर्चा काढत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारीविरोधात निर्णायक लढ्याचा इशारा दिला. सलग तीन दिवस सुरू असलेला श्रीरामपूर बंद जनतेची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरता मागे घेण्यात आला असला, तरी जोपर्यंत सर्व प्रकारच्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत विविध मार्गांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सभेत व्यक्त करण्यात आला. “श्रीरामपूर नशामुक्त झालेच पाहिजे’, “दहशतमुक्त झालेच पाहिजे’, “गुन्हेगारांवर मोका लावाच’ आणि “आकाश दुबय्याला न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. हनुमान मंदिरातून सुरू झालेला मोर्चा महात्मा गांधी चौक, मेन रोड, छत्रपती शिवाजी रोडमार्गे शिवतीर्थावर पोहोचला. भगव्या टोप्या परिधान केलेले हजारो नागरिक, व्यापारी, सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि दुबय्या कुटुंबीय या मोर्चात सहभागी झाले. खुनानंतर पोलिस प्रशासनाने शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करूनविविध गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. शीघ्र कृती दलासह अतिरिक्त पोलिस फौजही तैनात करण्यात आली होती. आरोपींना वकीलपत्र नाकारले आकाश दुबय्या हत्या प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र श्रीरामपूरमधील कोणत्याही वकिलाने स्वीकारले नसल्याची माहिती आंदोलनादरम्यान देण्यात आली. स्थानिक वकील संघटनेनेही संघटित गुन्हेगारीविरोधातील कारवाईला पाठिंबा जाहीर केला. मोर्चात बेग, जेधे यांच्यावर केले आरोप मोर्चादरम्यान मृत आकाश यांचे वडिल शेखर दुबय्या यांनी थेट बेग आणि जेधे यांच्यावर आरोप केले. मात्र सागर बेग यांनी आपला या गुन्ह्यात कोणताही संबंध नसल्याचा खुलासा पत्रकार परिषदेत केला आहे. बुधवारी सकाळी हनुमान मंदिरात महाआरती करून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी सर्वांनी भगव्या टोप्या घातल्या होत्या. दरम्यान शहर बंदच्या वेळी मंगळवार व बुधवारी शाळा, महाविद्यालये बंद होते. तर बुधवारी पेट्रोल पंपही बंद होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *