![]()
वाखरी ते पंढरपूर या मार्गावरील महत्त्वाच्या दोन्ही पुलांची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. तसेच रस्त्याचेही बहुतांश काम पूर्ण झाले आहे. येत्या आठ दिवसांत आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसवून, रस्ता भाविकांसाठी सुरक्षित आणि सुरळीत केला जाईल, अशी माहिती राष
.
पालखी सोहळ्याचे पंढरपूर तालुक्यात २२ जुलै रोजी आगमन होणार असून, तत्पूर्वी भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे. वाखरी येथील पालखी महामार्ग बायपास ते पंढरपूर शहरातील सरगम चौकापर्यंत रस्त्याची कामे सुरू आहेत. यामुळे जागोजागी वाहतुकीस अडथळा येत आहे. वाहतुकीची कोंडी होत असून, धुळीमुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून या मार्गाच्या कामाला गती देण्यात आलेली आहे.
वाखरीतील ओढ्यावर नवीन पूल बांधण्यात आलेला आहे. या पुलाच्या बाजूने गावात जाण्यासाठी आवश्यक सर्व्हिस रस्ता करण्यात आलेला असून, दोन दिवसांपासून हा रस्ता सुरू झाल्यामुळे वाखरीतील जुन्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी झालेला आहे. मलपे ओढ्यावरील नवीन पुलाचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूने रस्ता जोडून सरगम चौकापर्यंतची कामे पूर्ण झाली आहेत. राडारोडा दूर करणे, सफाई चालू आहे. मलपे ओढा पुलावरील काम दोन दिवसांत पूर्ण होईल, त्यानंतर २० तारखेपर्यंत वाहतुकीसाठी मलपे ओढ्यावरील पूल सुरू होईल, अशीही माहिती देण्यात आली. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात महामार्गाच्या जागेत पोलीस चौकी असून, ही पोलीस चौकीच अनधिकृत, अतिक्रमण करून उभी केलेली आहे. या चौकातील सर्व खासगी अतिक्रमणे काढण्यात आलेली आहेत. परंतु पोलीस चौकीचे अतिक्रमण आता रस्त्यात येत आहे. चौकातच हे अतिक्रमण असून, नगरपालिका प्रशासनाने शहरातील सर्व खासगी अतिक्रमणे काढली, परंतु रस्त्यावरील सरकारी अतिक्रमण काढलेले नाही. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खासगी अतिक्रमणे काढली, पोलिस चौकी मात्र दिमाखात