Headlines

उपसभापती सचिन अहिर यांना शासकीय बंगला नाकारला?:रायगड ऐवजी मिळाला फ्लॅट; मंत्री नसलेल्या रवींद्र चव्हाणांकडे बंगला




उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले विधानपरिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर सध्या शासकीय निवासस्थानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. उपसभापतीपदाची मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरळी मतदारसंघात जाहीर सभा घेऊन कामाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना हक्काचा शासकीय बंगला नाकारण्यात आला असून त्याऐवजी फ्लॅट मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, अहिर यांनी अद्याप हा फ्लॅट स्वीकारलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, उपसभापती सचिन अहिर यांच्यासाठी सुरुवातीला ‘रायगड’ हा शासकीय बंगला देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, हा बंगला सध्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात आहे. २०१४ च्या मंत्रिमंडळ रचनेनंतर (आणि २०२६ मधील सद्यस्थितीत) रवींद्र चव्हाण मंत्री नसले, तरी गेल्या दीड वर्षांपासून ‘रायगड’ बंगला त्यांच्याकडेच आहे. परिणामी, हा बंगला उपसभापतींना मिळू शकलेला नाही. ‘पुरंदर’ बंगला बनसोडेंना ‘रायगड’ व्यतिरिक्त सचिन अहिर यांना ‘पुरंदर’ (C-3) हा बंगला मिळण्याची सुरुवातीला दाट शक्यता होती. हा बंगला यापूर्वी माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे होता. परंतु, सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच हा बंगला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना घाईघाईने वाटप करण्यात आला. एकनाथ शिंदेंच्या कानावर विषय घालणार? यामुळे सध्या मुंबईत एकही शासकीय बंगला रिक्त नसल्याने राज्य सामान्य प्रशासन विभागाने सचिन अहिर यांना एक फ्लॅट मंजूर केला आहे. अद्याप सचिन अहिर या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेले नसून, बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्याचा हा संपूर्ण विषय ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून तोडगा काढण्याची विनंती करणार असल्याचे समजते. वरळीतील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी दरम्यान, सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. “आम्ही अहिर यांना पक्षात सर्वकाही दिले, ते नेहमी माझ्या सावलीसारखे सोबत असायचे. आता त्यांना आणखी काय हवे होते?” असा उद्विग्न सवाल आदित्य यांनी केला होता. या टीकेला सचिन अहिर यांनी वरळीत जाहीर सभा घेऊन चोख प्रत्युत्तर दिले होते आणि मतदारसंघात आपली ताकद दाखवून दिली होती. अशातच आता त्यांना शासकीय बंगला मिळवण्यात अपयश आल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… रायपूरमध्ये E-20 पेट्रोल टाकल्याने इंजिन खराब:ग्राहक न्यायालय म्हणाले- मारुती सुझुकीने नवी कार किंवा 20 लाख परत द्यावे; देशातील पहिले प्रकरण
देशभरात पेट्रोलमध्ये E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधन) च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याच दरम्यान रायपूरमध्ये E20 पेट्रोलमुळे कारचे इंजिन खराब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधित प्रकरणात ग्राहक न्यायालयाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि तिच्या अधिकृत डीलरला जबाबदार धरले आहे. न्यायालयाने सांगितले की, नवीन कार द्यावी किंवा 20 लाख रुपये परत करावेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *