![]()
कोल्हापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नवी वाशी नाका परिसरात भाजपचे कार्यकर्ते सुरज साखरे यांच्यावर दोन अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केला. या हल्ल्यात साखरे जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार जुन्या वादातून आणि खासगी सावकारकीच्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाला असण्याचा दाट संशय आहे. जखमी झालेले सुरज साखरे यांच्यावर यापूर्वीही काही पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याच गुन्हेगारी पार्श्वभूमीतून किंवा आर्थिक वादातून हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. नवी वाशी नाका परिसरात थरार सुरज साखरे हे नवी वाशी नाका परिसरात असताना अचानक दोन हल्लेखोर तिथे आले. त्यांनी थेट साखरे यांच्या दिशेने गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ आणि पळापळ उडाली. सुदैवाने, या हल्ल्यात साखरे यांना गोळी चाटून गेल्याने ते किरकोळ जखमी झाले. हल्ल्यानंतर तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांकडून नाकाबंदी; तपास सुरू घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. कोल्हापूरसारख्या शांत शहरात भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. हे ही वाचा… काटेवाडीत पार पडले तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण:मेंढ्या का मारतात रथाला प्रदक्षिणा? जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो वारकरी, भाविक आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण काटेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, हे रिंगण इतर रिंगणांपेक्षा वेगळे ठरते कारण येथे अश्वांचे (घोड्यांचे) नाही, तर ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ पार पडते. सविस्तर वाचा… उपसभापती सचिन अहिर यांना शासकीय बंगला नाकारला?:रायगड ऐवजी मिळाला फ्लॅट; मंत्री नसलेल्या रवींद्र चव्हाणांकडे बंगला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले विधानपरिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर सध्या शासकीय निवासस्थानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. उपसभापतीपदाची मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या वरळी मतदारसंघात जाहीर सभा घेऊन कामाला सुरुवात केली आहे. मात्र, त्यांना हक्काचा शासकीय बंगला नाकारण्यात आला असून त्याऐवजी फ्लॅट मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, अहिर यांनी अद्याप हा फ्लॅट स्वीकारलेला नाही. सविस्तर वाचा…
Source link
कोल्हापुरात भरदिवसा गोळीबाराचा थरार:भाजप कार्यकर्त्यावर दोघांनी झाडल्या गोळ्या; खासगी सावकारकीच्या वादातून हल्ल्याचा संशय