राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, यासाठी आपण पंढरपुरात विठ्ठलाला साकडं घालणार आहोत, असे मोठे विधान नुकतेच राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले होते. या विधानाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व त
.
विठ्ठलाकडे काय मागावे?
दत्ता भरणेंच्या विधानावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “विठ्ठलाला चांगला पाऊस पडू दे, पिके चांगली येऊ दे आणि रोगराई कमी होऊ दे, असे साकडं घालायचे असते.”
जयंत पाटील आणि राष्ट्रवादीची भेट
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि जयंत पाटील यांच्या संभाव्य एनडीए (NDA) प्रवेशाच्या चर्चांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “देवेंद्रजी लोकांना पहाटे 3 वाजेपर्यंत भेटतात, त्यामुळे रात्रीच्या अंधारात गेले याला काही अर्थ नाही. त्यांची काही सामायिक कामे असतील. तसेच, राष्ट्रवादी (शरद पवार गट) किंवा जयंत पाटील यांना एनडीएमध्ये घेण्याबाबत आमच्या कोअर कमिटीसमोर अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास बेरजेचे आणि वजाबाकीचे राजकारण पाहून निर्णय घेतला जातो.”
मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रस्ताव नाही
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सध्या तरी कोणतीही चर्चा किंवा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कुठल्याही मंत्रिमंडळात फेरबदल करताना 2-4 वरिष्ठ नेते बसून मंत्र्यांची ‘गुणपत्रिका’ पाहतात. कोण काम करणार, कोण नाही याचा प्रस्ताव दिल्लीला जातो. पण राज्यात अद्याप अशी कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.
संजय राऊतांना रामरक्षेवरून सुनावले
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या निषेधार्थ ठाकरे गटाने नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन आयोजित केले असून, त्यात फडणवीसांना सहभागी होण्याचे निमंत्रण संजय राऊत यांनी दिले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले, “त्यांना रामरक्षा म्हणायला कारण लागते, आम्ही रोजच म्हणतो. मी रोज पिंडीवर अभिषेक करूनच घराबाहेर पडतो, त्यासाठी आम्हाला मंदिरात चोरी होण्याची वाट बघावी लागत नाही. तुम्हाला श्रद्धेपेक्षा राजकारण करायचे आहे. दानपेटीत एखाद्या कर्मचाऱ्याने भ्रष्टाचार केला असेल, तर त्यावर कारवाई होईल; यात योगी आदित्यनाथ किंवा मोदींचा संबंध कुठे आला?”
वारकरी कुटुंबांना आर्थिक मदत
पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातातील पीडित कुटुंबांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. या अपघातात आता आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. शासन नियमानुसार प्रत्येक कुटुंबाला सुमारे 10 लाखांची मदत दिली जाईल (अपघात विमा 4 लाख + वारकरी विमा 4 लाख + गोपीनाथ मुंडे विमा 2 लाख). याव्यतिरिक्त, कोल्हापूरमधील एका पीडित कुटुंबातील मुलीला सीए (CA) चे शिक्षण घ्यायचे असल्याने, जोपर्यंत तिचे शिक्षण सुरू राहील तोपर्यंत तिला दरमहा 5000 रुपये स्वतःच्या ऑफिसमधून दिले जातील, अशी मोठी वैयक्तिक मदत त्यांनी जाहीर केली.
यावेळी प्रशासनावर सतत टीका करणाऱ्या खासदार विशाल पाटील यांनाही त्यांनी संयमाचा सल्ला दिला. “नम्र होऊन साखर खावी, असे अकांडतांडव करून काहीच होत नसते,” असे ते म्हणाले.
संबंधित बातमी वाचा…
फडणवीस केंद्रात गेल्यास सुनेत्रा पवारांनी राज्याचे नेतृत्व करावे- दत्तात्रय भरणे:म्हणाले- सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मजबूत

महाराष्ट्रातील कर्तबगार नेतृत्वाने देशाचे पंतप्रधान व्हावे, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे. मागील काळात यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांना या पदाने हुलकावणी दिली. मात्र, सध्याच्या घडीला राज्यात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव नेते आहेत, जे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. त्यांनी आत्ताच पंतप्रधान व्हावे असे आमचे म्हणणे नाही, पण भविष्यात महाराष्ट्राला ही संधी मिळावी यासाठी मी पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घातले आहे, असे वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी