Headlines

राऊत सामना सोडून एकनाथ शिंदेंचे ड्रायव्हर झालेत का?:महाराष्ट्रात 'सब कुछ' देवाभाऊच, ज्यांना आयुष्य सुखकर करायचे त्यांनी त्यांच्या मार्गाने जावे- नीतेश राणे




एकनाथ शिंदे प्रवासादरम्यान दिल्लीला काय काय घेऊन जातात, हे केवळ त्यांच्या वाहनचालकालाच माहिती असू शकते. त्यामुळे संजय राऊत यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील नोकरी सोडून ते शिंदेंकडे ड्रायव्हर म्हणून रुजू झाले असावेत, असा खोचक टोला भाजपचे नेते नीतेश राणे यांनी लगावला आहे. नीतेश राणे म्हणाले की, शरद पवार एनडीएबरोबर जाणार का नाही हा विषय वरीष्ठ पातळीवरील आहे. पण आमच्या राज्यामध्ये सब कुछ देवाभाऊ आहेत.ज्यांना ज्यांना आपले आयुष्य सुखकर करायचे आहे त्यांनी देवाभाऊंच्या मार्गावर गेले पाहिजे. डिलिमिटेशन बिल सरकार आणतंय कारण ती देशाची गरज आहे. शरद पवार यांच्या पक्षाने जी भूमिका घेतली आहे ती चांगली आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या दृष्टीने मतदारसंघाची रचना होणं गरजेचे आहे. त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असेल तर मी त्यांचे आभार मानत अभिनंदन करतो. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी नीतेश राणे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये बाबरी मशिद बांधली जात आहे, त्या मशिदीच्या दान पेटीमध्ये काही महिन्यापूर्वी मोठा घोटाळा झाला होता. याचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी का केला नाही? अरविंद सावंत, आदित्य ठाकरेंनी त्यावर आंदोलन का केले नाही. जिहाद्याची आणि पाकिस्तान्याची भाषा उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत बोलत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. या लोकांनी हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. सावंतांनी कुराण-इस्लाममधील चुकांवर प्रश्न विचारावा नीतेश राणे म्हणाले की, हिंदू धर्माला आम्ही विशाल का म्हणतो तर आमच्या भगवतगीतेमध्ये चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाचा विरोध करणं हा उल्लेख केला आहे. आमच्या काही चुका झाल्या त्या आम्ही स्वीकारल्या आहे. हिंदू म्हणून चुका स्वीकारणे आणि त्या दुरुस्त करणे हेच खरे हिंदुत्व आहे. आम्ही आमच्या अनेक प्रथा चुकीच्या आहेत म्हणून बंद केल्या हा हिंदू धर्म आहे. पण इस्लाम आणि कुराणबद्दल आपण हे बोलू शकतो का? कारण इस्लाममध्ये लोकांना मारा, जिहाद करा, कोणाची अब्रु लुटा त्यांचे ते लोकं समर्थन करतात. निदा खान यांचे समर्थन करणारे अनेक मौलवी आम्ही पाहिले आहेत. निदा खान जिहाद करत असताना ते लोकं तिच्या समर्थनात उभी राहिली. पण अशोक खरातच्या बाबतीमध्ये आमचे हिंदू समाजाचे कोणी उभे राहिले नाही, याला हिंदू समाज म्हणतात. अरविंद सावंत यांना हिंदू धर्म कळलेला नाही. त्यांनी कुराण बाजूला ठेवत भगवतगीता वाचली पाहिजे. चुकीला चूक म्हणणे हेच हिंदू धर्मात शिकवले जाते. यापुढे आमच्या चुका पुढे होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. कुराण-इस्लाममध्ये होणाऱ्या चुका ते मानणार आहेत का हा प्रश्न विचारण्याची हिंमत अरविंद सावंत यांनी दाखवली पाहिजे. भुमाफियांची व्याख्या काय? नीतेश राणे म्हणाले की, जयंत पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासंदर्भात भुमाफियांचा विषय मांडला. पण नेमके भुमाफियांची व्याख्या काय आहे? हे कधीतरी मला जयंत पाटील यांनी समजवले पाहिजे. जर जमीनीचा मालक ती जमीन स्वत:च्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीला विकतो, तिचा दर स्वत:च ठरवतो, यामध्ये सरकार कुठेच नसते, मग ते एखाद्या ग्रुपला जमीन विकतात मग ते भुमाफिया कसे झाले? भुमाफिया म्हणजे तो असतो जो जबरदस्तीने जमीन विकत घेता त्यांना भुमाफिया म्हणतात. जमीन घेणाऱ्या कंपन्या काही भुमाफिया नाहीत. जयंत पाटील त्यांच्या सांगली जिल्ह्यात जमीन विकत असताना भुमाफिया म्हणत नाही. ..तर आम्ही त्यांचे स्वागत करू नीतेश राणे म्हणाले की, जिहाद्याची भाषा बोलणारे, मुस्लीम लीगचे कपडे घालून सर तन जे जुदा बोलणारे जर आमच्या प्रभु श्री रामांच्या जवळ येत असतील तर मी त्यांचे स्वागत करतो.घरवापसी करणाऱ्या प्रत्येकाच्या मी हिंदू म्हणून स्वागत करेल, आज त्यांना जय श्री राम म्हणायचे सूचत असेल तर त्यांचे स्वागत आहे, मग त्यामध्ये काँग्रेस असो उबाठा असो त्यांना जर घरवापसी करायचे असेल तर हात पुढे करत आम्ही त्यांचे स्वागत करू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *