Headlines

Maharashtra Health Department Treats Over 3 Lakh Warkaris During Ashadhi Wari


आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून, १५ जुलैपर्यंत तब्बल ३ लाख १५ हजार २१ वारकऱ्यांना बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा देण्यात आली आहे. याशिवाय २ हजार ७६१ र

.

‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाने पालखी मार्गावरील प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे नियोजन यशस्वीपणे राबविले आहे. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, आयसीयू सुविधा, बाईक ॲम्बुलन्स, ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून भाविकांना तात्काळ उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

यावेळी वारीदरम्यान ताप, श्वसनविकार, अतिसार, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या विविध आरोग्य समस्यांवर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. १५ जुलैपर्यंत १९ हजार ३६ तापाच्या रुग्णांवर, ११ हजार ३०४ श्वसन संसर्गाच्या रुग्णांवर, ६ हजार २४५ उच्च रक्तदाब, ५ हजार ४६९ मधुमेह तसेच ९ हजार ९७७ अतिसाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रस्ते अपघात, हृदयविकार आणि इतर गंभीर रुग्णांनाही तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

वारकऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर अहोरात्र कार्यरत आहेत. यंदाच्या वारीत प्रथमच गंभीर रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ‘आरोग्यसंपन्न वारी’ मोबाईल ॲपद्वारे पालखी मार्गावरील आरोग्य सुविधा, उपचार केंद्रे, रुग्णवाहिका आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांची माहिती वारकऱ्यांना सहज उपलब्ध होत आहे.

याशिवाय पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ आयसीयू सुविधा, १५६ प्राथमिक उपचार केंद्रे, २१५ आरोग्यदूत कार्यरत आहेत. पंढरपूर येथे चोवीस तास आयसीयू सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच महाआरोग्य शिबिर, महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन केला आहे. दिंडी प्रमुखांना औषध संच वाटप केले जात आहे. पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, कीटकजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्य जनजागृतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा…

काटेवाडीत पार पडले तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण:मेंढ्या का मारतात रथाला प्रदक्षिणा? जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास

आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो वारकरी, भाविक आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण काटेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, हे रिंगण इतर रिंगणांपेक्षा वेगळे ठरते कारण येथे अश्वांचे (घोड्यांचे) नाही, तर ‘मेंढ्यांचे गोल रिंगण’ पार पडते. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.