संजय राऊत यांनी गांडूळासारखा ‘उबाठा’ गट भुसभुसीत करत आतून पूर्णपणे पोखरून काढला आहे. ते स्वतः दोन तोंडी गांडूळ आहेत. अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चेवर आणि
.
नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची सेवा करणे सध्या जास्त गरजेचे आहे. राऊतांची इच्छा असेल की ‘देवाभाऊंनी’ राष्ट्राची सेवा करावी, पण ते योग्य वेळी तिथे जातील; राऊतांनी ते सांगण्याची गरज नाही. 2029 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचीच सेवा करतील आणि 2029 ची विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत. जनतेने त्यांना 5 वर्षांसाठी निवडून दिले आहे.

राऊतांनी संघ भूमीत नाक घासून माफी मागावी
नवनाथ बन म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वासाठी काम करतात, राऊतांसारख्या ‘औरंगजेब फॅन क्लब’साठी नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली. काँग्रेसच्या दावणीला पक्ष नेऊन बांधल्यामुळेच तुमचे पदाधिकारी तुम्हाला सोडून जात आहेत आणि आता तुम्हाला प्रभू श्रीरामांची आठवण येत आहे, असा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत गेले दोन दिवस नागपुरात असूनही त्यांना संघ मुख्यालयात जायला वेळ नाही. राऊत आणि ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याप्रकरणी संघ स्थानावर जाऊन, नाक घासून माफी मागितली तर ‘देवाभाऊ’ काय, संपूर्ण भाजप तुमच्या आंदोलनाला उपस्थित राहील. हिंदुत्ववादी जनताही तुम्हाला तेव्हाच माफ करेल.
नीतेश राणे हिंदुत्वासाठी लढतात
नवनाथ बन म्हणाले की, नीतेश राणेंपेक्षा संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जास्त काळ होते, हा न्याय लावायचा झाला तर राऊत सर्वाधिक काळ शरद पवारांसोबत राहतात. नीतेश राणे हे संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वासाठी लढत आहेत, तर संजय राऊत हे केवळ इतरांच्या दाढ्या कुरवळण्याचे काम करत असून राजकारणातील सर्वात मोठा मूर्खपणा करत आहेत.