Headlines

नांदेड हादरले:2 दोन चिमुरड्यांसह शिक्षकाची गोदावरी नदीत कार झोकून आत्महत्या, मानसिक छळाला कंटाळून शिक्षकाचे टोकाचे पाऊल




नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत झोकून दिल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत सुनील मोरे व त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील नारायण मोरे हे नांदेड शहरातील अंबानगर परिसरात वास्तव्यास होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पत्नी कार्यरत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेसंदर्भात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे ते तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.
घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या लॅपटॉपमध्ये एक सविस्तर नोट लिहून ठेवल्याची माहिती आहे. हे. तसेच त्यांनी मोबाईलच्या स्टेटसवरही आत्महत्येचा उल्लेख केल्याची माहिती आहे. मित्राला केला होता कॉल या नोटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा, हिमायतनगरचे गटशिक्षण अधिकारी किशन फुले, केंद्रप्रमुख शिवाजी कदम तसेच सहकारी दत्ता पवळे यांच्याकडून झालेल्या कथित मानसिक छळामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.दरम्यान, गोदावरी नदीत कार झोकून देण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या एका मित्राशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याचीही माहिती समोर आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीतून कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली असून शिक्षक वर्तुळासह सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाबींचा तपास सुरू केला असून, कथित आत्महत्येची कारणे, लॅपटॉपमधील मजकूर आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *