![]()
अन्न भेसळविरोधी धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आता विभागातील अंतर्गत वादामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची कार्यपद्धती आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार, प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या काम-जीवन समतोलावर परिणाम होत आहे. वाढीव कामासाठी आवश्यक सुविधा किंवा अतिरिक्त मनुष्यबळ न देता कामकाज वाढविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 29 कर्मचाऱ्यांच्या सह्या, मंत्र्यांकडे निवेदन या निवेदनावर प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. दोन शिफ्ट सुरू करण्यापूर्वी आवश्यक मनुष्यबळ आणि उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, रिक्त पदे तातडीने भरावीत आणि कार्यालयीन वेळ पूर्ववत करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. कर्मचाऱ्यांचे मुख्य आरोप काय आहेत? 15 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी खालील गंभीर आक्षेप नोंदवले आहेत# कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रयोगशाळेतील सहसंचालकांसह 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या निवेदनात प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. सरकारची भूमिका काय? या तक्रारीमुळे अन्न व औषध प्रशासन विभागातील अंतर्गत कामकाज आणि व्यवस्थापनाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. तक्रारीवर मंत्री नरहरी झिरवळ किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… 31 डिसेंबरपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवा; अन्यथा सर्वांवर समान कारवाई, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा स्पष्ट इशारा राज्यातील प्रत्येक वाहनावर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) असणे बंधनकारक असून, जुन्या वाहनांवर ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी वाहनधारकांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट न लावलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, या कारवाईत सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधी असा कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समान नियम लागू राहतील, असा स्पष्ट इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
2 शिफ्टमध्ये काम अन् सुट्ट्याही रद्द!:तुकाराम मुंढेंविरोधात 29 कर्मचाऱ्यांनी थोपटले दंड; अपुऱ्या मनुष्यबळाचा दावा, थेट मंत्र्यांकडे केली तक्रार