Headlines

'मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही':त्यावर सरकार निर्णय घेईल, छगन भुजबळ यांचे विधान; समता परिषदेची बैठक पार




एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आगामी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची जोरदार तयारी करत असतानाच, दुसरीकडे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी बऱ्याच काळानंतर आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत भुजबळांनी समता परिषदेच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला आणि विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. या विशेष बैठकीत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. तसेच, ओबीसी आरक्षण संपल्याबाबत लक्ष्मण हाके यांच्याकडून सातत्याने होत असलेले वक्तव्यही पूर्णपणे अमान्य असल्याचे ठामपणे नमूद केले. छगन भुजबळ म्हणाले, कोण म्हणतंय ओबीसीचे आरक्षण संपले? जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय. 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच महात्मा फुले यांचे वाङमय भाषण यावर आम्ही मागणी केली त्यावर सरकार काम करत आहे, अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली आहे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर आम्ही काय बोलणार, सरकार त्यावर बोलतील आणि निर्णय घेतील. आम्ही जात जनगणना मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जाती त्यावर सरकार निर्णय घेणार आहे. प्रत्येक राज्यात ओबीसींचे नाव त्यावर आम्ही मागणी केली, तो शोध घेतला जात आहे. माळी समाज हा महाराष्ट्रात आहे, जेव्हा लढ्याचे तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आम्ही राज्यात फिरलो. छगन भुजबळ हा काय घाबरला? असा सवालही नाही, असे सांगत त्यांनी जेव्हा गरज होती तेव्हा आपण लढलो असल्याचे स्पष्ट केले. तसेच सरकार आमच्यासोबत असून चर्चेतून आम्ही मार्ग काढत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एल निनोचा प्रादुर्भाव राज्यात एल निनोच्या प्रादुर्भावावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्यात एल निनोचा मोठा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी पाऊसच नाही. पुन्हा उष्णता वाढलेली आहे, हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे. तसेच एसआयआरबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, जे कोणी नेते आहेत, ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी यावर काम केले पाहिजे. सारकारच्या सोबत काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तुकाराम मुंढे चांगले काम करतात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामासंदर्भात बोलताना छगन भुजबळ म्हणाले, तुकाराम मुंढे चांगले काम करत आहेत, अन्न हा असा प्रकार आहे, जो श्रीमंत गरीब सर्वांसाठी आवश्यक आहे. स्वच्छता असणे हे त्यासाठी महत्त्वाचे आहे. तुकाराम मुंढे ज्यावर बोट ठेवतात त्यावर सगळेच मागणी करतात, तशीच मागणी अंगणवाडी समितीने केल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *