![]()
भाजपकडून सर्वच पक्षांना तोडण्याचा प्रयत्न होत आहे. ते लोकांना घाबरवतात. पण आता बकासुराचा अंत झाला आहे. शिवसेनेबद्दन 29 एप्रिलला सुनावणी झाली नाही तर आम्ही आपली भूमिका मांडू, असे उबाठाचे खासदार संजस राऊत यांनी म्हटले आहे. जर कोर्टाकडे ऐकूण घेण्यासाठी वेळ नसेल तर आम्ही काय बागेश्वर बाबाकडे जावे का? त्यांना कोर्टात आणत आमचे वकील केले तरच आमचा आवाज ऐकला जाईल का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार फुटून भाजपमध्ये जाणार हे तुम्ही पाहताल. आमच्यावर सुद्धा पक्ष सोडावा म्हणून दबाव टाकण्यात आला होता पण आम्ही पक्ष सोडला नाही. आम्ही त्यावेळी व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहित सांगितले की माझ्यावर पक्ष सोडण्यासाठी दबाव आणला जात आहे. मला अटक करण्यात आली तेव्हाही माझ्यावर दबाव होता की पक्ष सोडा, पण आम्ही पक्ष सोडला नाही. जेलमध्ये जाणं पसंत केले. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते घाबरतात, ते घाबरत पक्ष बदलतात. विरोधी पक्ष काही कमजोर होत नाही. गेलेले लोकं हे काही लोकनेता नाही. भाजपचा कचरा डेपो झाला आहे तिथे असा कचरा जाम होत आहे. रेड पडल्यानंतर पक्षांतर संजय राऊत म्हणाले की, आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार यांनी काल बीजेपीमध्ये प्रवेश केला. हे खासदार पंजाबमधील आहेत. भाजप जे राजकारण करते आहे ते सर्वांना माहिती आहे ते निर्लज्जपणे राजकारण करतात. पण कालपर्यंत आमच्यासोबत असणारे चड्डा हे भाजप गुंडाची पार्टी आहे असे म्हणत होते. चड्डा, मित्तल, पाठक हे सर्व जण हेच म्हणत होते त्यांनी अचानक भाजप प्रवेश केला. अचानक त्यांच्या संस्थेवर ईडीच्या रेड झाल्या आणि ते घाबरत भाजपमध्ये गेले. महाभारतामध्ये बकासूर होता त्याचे पोट कधी भरत नव्हते तसे भाजप बकासुरांचा पक्ष झाला आहे. ट्र्प यांनी जे भारत नरक आहे असे म्हटले आहे ते नेमके काय आहे हे भाजप वारंवार दाखवून देत आहे. ट्रम्प खरे बोलत होते. 7 खासदार गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. निवडणूक आयोग-सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा नाही संजय राऊत म्हणाले की, भाजप हा गुंडाचा पक्ष आहे त्यामध्ये मी कधीही जाणार नाही असे वक्तव्य राघव चड्डा अनेक वेळा करत आले आहेत. भाजप गुंडाचा पक्ष होता तर आता काय पवित्र झाला आहे का? भाजप दिसेल ते खात सुटलेला आहे. पोट फाटेल तेव्हा सर्व काही बाहेर पडेल. राजकारण आणि समाजकारणाचा नरक या लोकांनी केला आहे. या क्षणाला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे आम्हाला बागेश्वर बाबांच्या दरबारात जात न्याय मागावा लागेल. सुनावणी घेण्यास कोर्टाला वेळ नाही संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेबद्दन सुनावणी घेण्यास कोर्टाला वेळ नाही केवळ तारखांवर तारखा पडत आहेत. असे काय महत्त्वाचे काम तुमच्यासमोर? चड्डा यांचा पक्षप्रमुख पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लघंन म्हणावे लागेल.
Source link
भाजप म्हणजे 'बकासुराचा' पक्ष!:न्याय हवा असेल तर 'बागेश्वर बाबां'कडे जायचे का? राघव चड्डांच्या भाजप प्रवेशावर राऊतांची जहरी टीका