Headlines

Moshi Garbage Depot Accident | Commissioner Suryawanshi Assures Trapped Kin


मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या पाठीश

.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नातेवाईकांना सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या सर्व यंत्रणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), भारतीय सेना, अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणा पूर्ण क्षमतेने आणि अत्यंत समन्वयाने बचावकार्य करत आहेत. ही वेळ अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक नागरिकाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे.

ते पुढे म्हणाले, प्रशासन संपूर्ण ताकदीने युद्धपातळीवर काम करत आहे. उपलब्ध सर्व मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक साधनांचा वापर करून शोध व बचाव मोहीम अखंडपणे सुरू आहे. तसेच प्रशासन तुमच्यासोबत आहे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी दिली जाईलअसेही त्यांनी नातेवाईकांना सांगितले.

घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक थांबलेले आहेत. त्यांच्या भोजन, निवास आणि इतर सर्व आवश्यक सुविधा त्यांना पुरवा असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अँटनी अँड लारा कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले.

दरम्यान, एनडीआरएफचे सेकंड कमांड दीपक तिवारी यांनी बचावकार्याची तांत्रिक माहिती नातेवाईकांना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.

३० तासांपासून बचावकार्य सुरू, ९ जणांना काढले बाहेर

दरम्यान, या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्याबाबत एनडीआरएफचे (NDRF) सेकंड-इन-कमांड (ऑपरेशन्स) दीपक तिवारी म्हणाले, “गेल्या साधारण ३० तासांपासून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत नऊ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे आणि एकाचा मृतदेह सापडला आहे. अजूनही तीन ते चार जण अडकलेले असण्याची शक्यता आहे. इमारत पुढच्या दिशेला झुकली असून ती ‘कँटिलिव्हर’ स्थितीत्र आली आहे; यामुळे ती अत्यंत अस्थिर झाली असून बचावकार्यात अडथळे येत आहेत. शिवाय, तिथे साचलेला कचरा आणखी एक धोका निर्माण करत आहे. आमच्या पथकांना इमारतीच्या आत प्रवेश करता यावा यासाठी आम्ही ढिगारा हटवत आहोत. एकदा का हा ढिगारा हटवला गेला की, आम्ही बचावकार्य पुढे चालू ठेवू. आम्ही तांत्रिक साधने, श्वानपथक आणि प्रत्यक्ष (मॅन्युअल) अशा विविध पद्धतींनी शोधमोहीम राबवली आहे.”

हे ही वाचा…

मोशी कचरा डेपो दुर्घटनेची चौकशी करा:जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खासदार श्रीरंग बारणेंची मागणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली होती, ज्यासाठी केंद्र सरकारने १३५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. सविस्तर वाचा…

मोशी दुर्घटनेत एकाचा मृत्यू:आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका, अद्याप 6 ते 7 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतून आज सकाळपर्यंत ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असतानाच, आता एक अत्यंत दुःखद आणि मोठी अपडेट समोर आली आहे. कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलेल्या ९ कर्मचाऱ्यांपैकी एका कर्मचाऱ्याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल दुपारपासून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या मोहिमेत ९ जणांना जिवंत काढण्यात यश आले असले, तरी उपचारादरम्यान एकाचा बळी गेल्याने मोशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.