![]()
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ रोजी घोषित करण्यात आला. या निकालात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींनीच सरस कामगिरी केल्याचे दिसून आले. अंजनगाव सुर्जी येथील रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलच्या रिद्धी शर्माने १०० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे होलिक्रॉस हायस्कूलच्या सई मोकलकरनेही ९९.६० टक्के गुणांसह शाळेत अव्वल स्थान मिळवले. गोल्डन किड्स शाळेच्या युक्ती भोगेने ९९.४० टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला, तर श्री समर्थ विद्यालयाच्या अनुष्का मशीदकरने उर्वरित. पान ४ सई सतीश मोकलकर, ९९.६० टक्के गुण ^व्हीडिओवरून अभ्यास करणे, अभ्यास करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. अशात शाळेत ज्या पारंपरिक पद्धतीने शिकवले जाते. त्यात व व्हीडिओतून केलेल्या अभ्यासात तफावत, संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थी गडबडत आहेत. तसेच रोजगाराच्या दृष्टीने कौशल्यपूर्ण शिक्षणाकडे कल वाढला आहे. त्यामुळे निकालातही घट झाली आहे. – डॉ. नितीन चवाळे, शिक्षणतज्ज्ञ स्वत:शी प्रामाणिक राहून अभ्यास केला तर यश निश्चितच मिळते. मी दररोज ३ ते ४ तास अभ्यास करायची. ध्येयाच्या दिशेने प्रामणिक प्रयत्न केल्यामुळे मला यश मिळाले. मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचे आहे. सध्या जेईईची तयारी करीत आहे. माझे वडिल राजेश मशीदकर यांची वृत्तपत्र एजन्सी आहे. मी परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यामुळेच साध्य करता आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकाल २.४५ टक्क्यांनी घटला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले आहे. विभागात गैरप्रकार करणाऱ्या ६८ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले होते. त्यापैकी ३३ विद्यार्थी निर्दोष आहे तर ३५ जण दोषी आढळले आहेत. त्या ३३ पैकी दोन विद्यार्थ्यांची सर्वच विषयांची संपादणूक रद्द केली तर उर्वरित दोषी आढळलेल्या ३३ विद्यार्थ्यांची संबधित विषयांची सपांदणूक रद्द केली आहे. – प्रिया देशमुख, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती. अभ्यास करताना क्वालिटी नव्हे तर क्वांटीटीवर भर दिला. त्यामुळे नेमका कोणत्या विषयाचा कसा अभ्यास करायचा याचे नियोजन करता आले. मला जेईईची तयारी करायची असून भविष्यात एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचे आहे. केवळ अभ्यासच नव्हे तर चित्रकलेचीही मला तेवढीच आवड आहे. त्यामुळे एलिमेंट्री परीक्षेत अ श्रेणी मिळवली. दहावीचे वर्ष असतानाही गायनाच्या लहान मैफलींना हजेरी लावली. गायनाच्या चार परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. त्यामुळे गायनासह दररोज नियमितपणे ६ तास अभ्यास केला. वडील व काका शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी कोणत्या विषयावर किती भर द्यायचा याबाबत वेळापत्रकच तयार करून दिले होते. जेईईची तयारी करून आयआयटी व एआय इंजिनियरींग करायचे. युक्ती अविनाश भोगे, ९९.४० टक्के गुण अनुष्का राजेश मशीदकर,९९.२० टक्के गुण कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम; गैरप्रकाराला आळा विद्यार्थ्यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेकडे दिसून आला जास्त कल
Source link
यंदा मुलींचीच सरशी; निकालात 2.80 टक्क्यांची घट:जिल्हा विभागात तिसरा, बहुतेक शाळांनी राखली उत्कृष्ट निकालाची परंपरा