Headlines

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून:पुणे, कात्रजमधील आंबेगाव भागात घडली घटना




कात्रजमधील आंबेगाव भागात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. दीपक क्षीरसागर (वय ३८, रा. समर्थ हाईट्स, इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक क्षीरसागर हे पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते आणि ते विवाहित होते. रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर ते इंद्रायणीनगर भागातील घरासमोर थांबले होते. त्याच वेळी दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात दीपक यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची लूट वारजे भागातील डुक्करखिंड परिसरात पोलिस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ नागरिकाकडील अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून चोरटे पसार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे वारजे माळवाडी भागात राहतात आणि दररोज सायंकाळी फिरायला जातात. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावरून जात असताना, डुक्करखिंड परिसरात दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवले आणि या भागात ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत असल्याचे सांगितले. त्यांनी तक्रारदाराला त्यांच्याकडील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी असा एकूण २ लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला.दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा करत चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले. संधी साधून चोरट्यांनी अंगठी आणि सोनसाखळी बदलून घेतली आणि तेथून पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *