Headlines

घाटीत परिचारिकांची 5 हजार पदे रिक्त:लेबर रूम, एनआयसीयूमध्ये रुग्णसेवेची अग्निपरीक्षा, वरिष्ठ पदे, मेट्रन, अधिसेविकांच्या जागांवरही भरती नाहीच




एकीकडे राज्य शासन नवनवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे या व्यवस्थेचा कणा असलेल्या परिचारिकांच्या रिक्त पदांकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या राज्यात परिचारिका संवर्गातील 8 हजार पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वाधिक 5 हजार पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागातही 25,274 मंजूर पदांपैकी 3,410 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे वॉर्डातील रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. सुट्ट्या किंवा प्रशिक्षणासाठी कोणी बाहेर गेल्यास उर्वरित नर्सेसवर अतिरिक्त भार पडत आहे. घाटीतील वरिष्ठ पदांचा वनवास घाटी रुग्णालयात 694 मंजूर पदांपैकी 62 पदे रिक्त असली, तरी वरिष्ठ प्रशासकीय पदांची अवस्था बिकट आहे. परिसेविकांची 88 पैकी 26 पदे रिक्त आहेत, तर विभागीय अधिसेविकेची 14 पैकी 11 पदे भरलेली नाहीत. विशेष म्हणजे मेट्रनची दोन्ही पदे रिक्त असल्याने कामकाजाच्या नियोजनात अडचणी येत आहेत. ओटी आणि लेबर रूममध्ये कठीण आव्हान सर्वात कठीण परिस्थिती लेबर रूम, ऑपरेशन थिएटर आणि नवजात शिशू विभागात (एनआयसीयू) पाहायला मिळते. दररोज होणाऱ्या 20 ते 25 सिझर ऑपरेशन्ससाठी परिचारिकांना सलग 8-8 तास उभे राहून सेवा द्यावी लागते. बाळ जन्मल्यापासून त्याचे डॉक्युमेंटेशन आणि आईपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यापर्यंतची सर्व जबाबदारी या परिचारिका पार पाडत आहेत. ओटीतले काम आव्हानात्मक “परिचारिकांसाठी लेबर रूममधील ओटीतले काम अत्यंत आव्हानात्मक असते. 8 तासांच्या ड्यूटीत सतत उभे राहून बाळाला रिसीव्ह करणे, ठसे घेणे आणि सर्व डॉक्युमेंटेशन पूर्ण करावे लागते. मात्र सर्व परिचारिका हे काम पूर्ण ताकदीने करतात.’ रंजना नागरे, परिसेविका बाळांचा आईप्रमाणेच सांभाळ “एनआयसीयूमध्ये प्री-टर्म बेबी आईसोबत नसल्यामुळे त्यांचे संगोपन आम्हालाच करावे लागते. बाळांना त्रास होऊ नये म्हणून शांत वातावरणात, आईची भेट होईपर्यंत आम्हीच आईच्या मायेने त्यांचा सांभाळ करतो.’ प्रमिला गुडेकर, नर्सिंग ऑफिसर, एनआयसीयू



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *