Headlines

इंदिरा गांधींनी सोने खरेदी टाळायला सांगितली तेव्हा अस्वस्थता नव्हती का?:शेतकरी आत्महत्या होत होत्या तेव्हा अस्वस्थता नव्हती का? भाजपचा पवारांना सवाल




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर शरद पवार म्हणातत की या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ज्यावेळी इंदिरा गांधी यांनी सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले होते त्यावेळी कोणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.जेव्हा तुम्ही कृषीमंत्री असताना महाराष्ट्रात शेकड्याने शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळी तुम्हाला अस्वस्थता जाणवली नाही का? त्यावेळी तुम्ही काही पावलं टाकली होती का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये एसआयआरमुळे भाजपचा विजय झाला नाही तर ममता बॅनर्जी यांची दहशत संपवण्याचे काम जनतेने केले आहे. रोहित पवार एसआयआरवर टीका करायची, निवडणूक आयोगावर टीका करायची हे धंदे तुम्ही बंद केले पाहिजे. एसआयआरमध्ये सर्वांधिक जास्त नावे ज्या 10 मतदारसंघामध्ये वगळली होती, त्या 10 पैकी 8 ठिकाणी टीएमसीचा विजय झाला आहे मग तुम्ही कसे एसआयआरवर आणि निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांवर खापर फोडतात. पवार युपीए सरकारच्या काळात अस्वस्थेवर बोलले नाही नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस, युपीएचे सरकार असताना रात्री 8 ते सकाळी 8 पेट्रोल पंप बंद होते त्यावेळी अस्वस्थता कुठे गेली होती. शरद पवार यांना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचेच काम उरले आहे का? ते देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. आपल्या युपीएच्या काळात अनेक मोठे घोटाळे झाले त्यावेळी तुम्ही अस्वस्थेच्या नावाने चकार शब्द सुद्धा काढला नव्हतात. रोहित पवारांनी मतदारसंघावर लक्ष द्यावे नवनाथ बन म्हणाले की, रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघावर लक्ष दिले पाहिजे. त्यांना वाटते राज्याचे आणि देशाचे नेतृत्व करावे पण त्यासाठी वेळ आहे. आधी आपल्या मतदारसंघात काय सुरू आहे, आपल्या पक्षात काय सुरू आहे हे रोहित पवारांनी पाहिले पाहिजे, पक्षाची अवस्था काय झाली हे पहा मग निवडणूक आयोगावर टीका करा, असे बन यांनी म्हटले आहे. ..म्हणून राज ठाकरेंच्या पोटात दुखले नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसरीचे आवाहन केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटात दुखायला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले आहे. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना सल्ला देण्याऐवजी आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी किंवा वाढीसाठी एवढे मोठे ट्विट लिहले असते तर त्याचा फायदा झाला असता. आपल्या पक्षाकडे लक्ष न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ले देण्याचे काम राज ठाकरे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *