Headlines

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनताहेत अपघाताचे मुख्य केंद्र




पैठण तालुक्यातील जामखेड परिसरातील ठाकूरवाडी फाटा येथे धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने चालकाचा ताबा सुटला आणि आई-मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दिवटे हे आपली आई रंजना दिवटे (दोघे रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्यासह दुचाकीवरून संभाजीनगरच्या दिशेने निघाले होते. ठाकूरवाडी फाटा परिसरात महामार्गावर पडलेल्या एका मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी त्यात जोरात आदळली. यात राहुल आणि रंजना दिवटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरूआहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात मोठमोठे खड्डे पडलेले असून, याच ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात आहे. भरधाव वाहतूक असलेल्या या मार्गावर रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. “एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *