Headlines

खरीप हंगामात खतांचा काळाबाजार,‎ लिंकिंग रोखण्यासाठी होतेय तपासणी‎:बोदवड तालुका कृषी विभागाचा पुढाकार; गोदामातील साठ्याचीही पाहणी



खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खत साठ्याची पडताळणी सुरू केली आहे. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येईल. प्रत्येक खरीप हंगामात खत विक्री व खरेदी हा महत्त्वाचा विषय अस

.

या सर्व कृषी केंद्रांमधील खत साठ्याची बोदवड कृषी विभागाकडून तपासणी सुरू आहे. तालुक्याची एकूण मागणी १०,७३६ टन आहे. पैकी युरियाची मागणी ३९ टन आहे. एप्रिलच्या सुरुवातीला तालुक्यात १२०० टन साठा उपलब्ध होता. आता जवळपास प्रत्येक दुकानावर खते उपलब्ध आहेत. या खतांचे वितरण योग्य पद्धतीने होण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची स्थापना केली आहे.

जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी हे पथक प्रमुख आहेत. संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सदस्य व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे या समितीचे सचिव आहेत. तालुकास्तरावर दोन निरीक्षक आहेत. नितीन महाजन हे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक तसेच गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप धांडे यांची नेमणूक झाली आहे.

बोदवड तालुक्यात कृषी विभागाकडून खत तपासणी मोहीम राबवताना. खरीप हंगामपूर्व सर्व रासायनिक खत विक्रेते, कृषी केंद्र धारकांची बारकाईने तपासणी केली जात आहे. गोदामातील युरिया, डीएपीचा साठा व पॉस मशीनमधील साठा जुळत नसेल तर संबंधितांना नोटीस बजावली जाईल. प्रसंगी कृषी केंद्रांचे परवाने रद्द केले जातील. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याकडील साठा अपडेट ठेवावा. दुकानासमोर भाव फलक लावावा, लिंकिंग करू नये असे आवाहन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *