मुंबईत मुसळधार पावसाचा कहर:अनेक ठिकाणी कंबरेएवढे पाणी, कुठे झाडे कोसळली; फोटो-व्हिडिओमधून पाहा मुंबईची तुंबई झालेली अवस्था
मुंबईकरांची सकाळ पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झाली आहे. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला आणि अंधेरी सबवेसह अनेक सखल भागांमध्ये कंबरेएवढे पाणी साचल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना पाण्यातून वाट काढताना प्रचंड…