Headlines

'आशाताई'- दि लास्ट एम्परर:लतादीदी 'दा विंची' तर आशाताई 'मायकलॅन्जलो, राज ठाकरेंची खास शब्दांतून श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले असून उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कलाकारांनी तसेच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More

पुणे मेट्रो लाईन 4, 4ए चे कोथरुडमध्ये सादरीकरण:चंद्रकांतदादा पाटील म्हणाले- मेट्रो पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग

पुणे मेट्रोच्या लाईन ४ आणि ४ ए प्रकल्पाचे सादरीकरण रविवारी कोथरुड येथील नागरिकांसमोर करण्यात आले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मेट्रो आता पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली असल्याचे प्रतिपादन केले. कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर आणि वारजे परिसराला जोडणाऱ्या या प्रस्तावित मेट्रो मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. स्थानिक नागरिकांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यासाठी…

Read More

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड:चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा दैवी आवाज शांत झाला – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत आपल्या शोकभावना व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या…

Read More

कामगार कायद्यातील सुधारणांचा कामगारांसह उद्योगांनाही फायदा:मंत्री आकाश फुंडकर यांचे मत; नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार प्रदान

केंद्र सरकारने विविध कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार व्यापक कामगार संहितांमध्ये रूपांतर केले असून, यामुळे कामगार कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहेत. यामुळे कामगारांचे हक्क बळकट होण्याबरोबरच उद्योगांसाठी सुसंगत व सुलभ नियामक व्यवस्था उपलब्ध होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत…

Read More

मतदार यादीतून नावे वगळू नका:छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना आढावा बैठकीत श्रीकांत शिंदे यांच्या सूचना

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सध्या सुरू असलेल्या मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणादरम्यान आपल्या हक्काच्या मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तालुका आणि विधानसभा पातळीवरील कार्यकर्त्यांनी यावर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव…

Read More

वडगाव खुर्द येथील आरएमसी प्लांटची खासदार कुलकर्णींकडून पाहणी:प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तातडीने स्थलांतराची मागणी

वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यसभा खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी या प्लांटचे तातडीने स्थलांतर करावे, अशा सूचना महापौर आणि महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव…

Read More

भोंदू खरातच्या कार्यालयाची पुन्हा झाडाझडती:विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे, आतल्या कडीवर खरातच्याच हातांचे ठसे

भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने पुन्हा एकदा खरातच्या कुख्यात कार्यालयाची झडती घेतली आहे. त्यात त्यांनी खरातविरोधात भक्कम पुरावे गोळा केलेत. या पुराव्यांच्या न्यायवैद्यक अहवालानुसार खरातच्या कार्यालयात आढळलेली विशिष्ट औषधाची बाटली, कुजलेले पेढे व केबिनच्या दरवाजाच्या आतील कडीवर खरातच्याच हातांचे ठसे आढळलेत. विशेष म्हणजे पीडित महिलांसोबत भोंदू खरातची झटापट झाल्याचे कोणतेही पुरावे…

Read More

गोदावरी पाटबंधारे महामंडळ स्वायत्त होणार:नियामक मंडळाच्या बैठकीत धरण परिसरात पर्यटन विकासाचा निर्णय

गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ लवकरच स्वायत्त होणार आहे. मराठवाडा, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन विकसित करण्याचा निर्णय नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. महामंडळाच्या प्रशासकीय फेररचनेची कार्यवाही या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. यंदा महामंडळाने ५२० कोटी रुपये वसुली केली असून, आर्थिक स्वावलंबनाकडे…

Read More

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:लग्नाचे आमिष, धर्मांतरासाठी दबाव-ब्लॅकमेलिंग, हिंदू मुलगी म्हणूनच मला केलं टार्गेट- पीडिता

आयटी क्षेत्रात माझं करिअर घडवायला गेली अन‌् आता मी आज अशा वळणावर उभी आहे, जिथे माझा विश्वास आणि माझा धर्म दोन्ही पायदळी तुडवले गेलेत. सोबत शिक्षण घेतलेल्या दोन मुलाच्या बापानं माझ आयुष्य उध्वस्त केलं. कॉर्पोरेट जिहादमधील पीडित युवतीने ‘दिव्य मराठी’कडे कथन केलेली काळजाचा थरकाप उडवणारी आपबीती तिच्याच शब्दात… मी 2022 मध्ये कॉलेजमध्ये शिकत होते. तानिश…

Read More

मुख्यमंत्री साहेब, हिंदू धर्मातही नास्तिकता मान्य आहे बरं!:तुम्हाला हिंदूत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते – काँग्रेस

वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाल्याच्या शरद पवारांच्या भूमिकेचे काँग्रेसने जोरदार समर्थन केले आहे. शरद पवारांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचारांच्या भोंदू बाबा, तथाकथित स्वयंघोषित आचार्य व विद्वेष पूर्ण विचारधारा पसरवणाऱ्या किर्तनकारांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना हिंदूत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते,…

Read More